

सोन्याचे दर स्थिर
चांदीचे दर १०,००० रुपयांनी घसरले
सोने-चांदीचे दर किती?
सध्या लग्नसराईच्या काळात अनेकजण सोने-चांदीचे दागिने खरेदी करतात. सोन्याच्या दागिन्यांना सध्या चांगलीच मागणी आहे. परंतु सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. सोन्याचे दर जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्नच खरेदीदारांना पडलेला आहे. दरम्यान, आता सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे दर नेहमी बदलत होते. मात्र, आज सोन्याचे दर स्थिर आहे. चांदीच्या दरात मात्र मोठा बदल झाला आहे. चांदीचे दर घसरले आहेत.
सोन्याचे दर पहिल्यांदाच स्थिर (Gold Rate Steady)
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे दर रोज बदलत होते. या किंमतीत थोडाफार फरक होत होता. मात्र, आज कोणताही बदल झालेला नाही. आजचे सोन्याचे दर जाणून घ्या.
आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,५५,२९० रुपये आहेत. ८ ग्रॅमचे दर १,२४,२३२ रुपये आहेत. १० तोळ्याचे दर १५,५२,९०० रुपये आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,४१,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,१३,८८० रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १४,२३,५०० रुपये आहेत.
चांदीचे दर घसरले (Silver Rate Decrease)
आज सोन्याचे दर बदलले नसले तरी चांदीचे दर घसरले आहेत. चांदीच्या दरात १ किलोमागे तब्बल १०,००० रुपयांची घसरण झाली आहे. १० ग्रॅममागे चांदी १०० रुपयांनी स्वस्त झाली असून २,६५० रुपये झाले आहेत. १०० ग्रॅममागे १००० रुपयांची घसरण झाली असून २६,५०० रुपये झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.