Gold News : सोनं खरेदी करण्याचा आजचा दिवस शुभ, ६ महिन्यांत सोन्याच्या दरात ४३००० रुपयांची वाढ

Gold Rate Hike Last 6 Month News : गुरुपुष्यामृत योग आज सायंकाळपासून सुरू होत असून सात महिन्यांनंतर आलेल्या या शुभ मुहूर्तात सोन्याच्या दरवाढीमुळे खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या बाजारातील स्थिती आणि गुंतवणुकीच्या संधी.
Gold News : सोनं खरेदी करण्याचा आजचा दिवस शुभ,  ६ महिन्यांत सोन्याच्या दरात ४३००० रुपयांची वाढ
Gold Rate Today NewsSaam tv
Published On
Summary
  • गुरुपुष्यामृत योग ७ महिन्यांनंतर २३ एप्रिल २०२६ रोजी सुरू

  • सोन्याच्या दरात ४३ हजारांहून अधिक वाढ

  • महागाईमुळे मोठ्या खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता

  • शुभ मुहूर्तामुळे छोट्या प्रमाणात खरेदीचा ट्रेंड कायम

संजय महाजन, जळगाव

Guru Pushya Amrit Yog 2026 गुंतवणूक आणि खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जाणारा गुरुपुष्यामृत योग गुरुवारी म्हणजेच आज २३ एप्रिल २०२६ सायंकाळपासून सुरू होत असून, तब्बल सात महिन्यांनंतर हा योग आल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वेळेस हा योग १८ सप्टेंबर २०२५ रोजी आला होता. परंपरेनुसार या दिवशी सोने, घर, वाहन खरेदी किंवा नवीन गुंतवणूक केल्यास आर्थिक प्रगती होते, अशी धारणा आहे.

मात्र, यंदा वाढलेल्या सोन्याच्या दरांमुळे ग्राहकांच्या खरेदीवर काहीसा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या सहा महिन्यांत सोन्याच्या किमतीत तब्बल ४३,०५४ रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२५ मधील गुरुपुष्यामृतच्या दिवशी सोन्याचा दर १,१४,०२१ रुपये प्रति तोळा होता, तर सध्या हा दर १,५७,०७५ रुपयांवर पोहोचला आहे. या वाढीमुळे मध्यमवर्गीय ग्राहकांच्या बजेटवर ताण येणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Gold News : सोनं खरेदी करण्याचा आजचा दिवस शुभ,  ६ महिन्यांत सोन्याच्या दरात ४३००० रुपयांची वाढ
Shocking : रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेला, सासऱ्यांनी नकार दिला; रागात जावयाने सासरवाडी पेटवली

अलीकडेच पार पडलेल्या अक्षय तृतीया निमित्त बाजारात सुमारे ६० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. त्यामुळे सलग दोन मोठे खरेदीचे मुहूर्त आल्याने गुरुपुष्यामृतच्या दिवशी खरेदीचे प्रमाण तुलनेने थोडे कमी राहू शकते, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. तरीही शुभ मुहूर्त साधण्यासाठी ग्राहक छोट्या प्रमाणात का होईना, पण सोन्याची खरेदी करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Gold News : सोनं खरेदी करण्याचा आजचा दिवस शुभ,  ६ महिन्यांत सोन्याच्या दरात ४३००० रुपयांची वाढ
Political News : भाजप नेत्याला मोठा दिलासा, बलात्कार प्रकरणात कोर्टाकडून क्लीन चिट; नेमकं काय घडलं होतं?

गुरुपुष्यामृत योगाची वेळ २३ एप्रिल रोजी रात्री ८.५८ वाजता सुरू होऊन २४ एप्रिलच्या पहाटेपर्यंत राहणार आहे. या कालावधीत केलेली खरेदी आणि गुंतवणूक शुभ मानली जाते. दरम्यान, आज खरेदी करणे शक्य होणार नाही, त्यांच्यासाठी पुढील काळातही दोन गुरुपुष्यामृत योग उपलब्ध आहेत. २१ मे २०२६ आणि १८ जून २०२६ रोजी हे योग येणार असून त्या दिवशीही खरेदी आणि गुंतवणुकीसाठी उत्तम संधी असेल. एकूणच, वाढत्या सोन्याच्या दरांमुळे खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता असली तरी शुभ मुहूर्तामुळे बाजारात काही प्रमाणात हालचाल राहणार असल्याचे चित्र आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com