Flight Ticket Rules Change  saam tv
बिझनेस

Flight Rules: गुड न्यूज! DGCA ने तिकिटासंदर्भात आणले नवीन नियम, विमान प्रवाशांना होणार मोठा फायदा; वाचा सविस्तर...

Flight Ticket Rules Change: विमान प्रवासाबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. विमान तिकिटाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमानुसार, तिकीट बुक केल्यानंतर ४८ तासांच्या आत कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता तिकीट कॅन्सल करू शकता.

Priya More

Summary -

  • विमान प्रवाशांसाठी डीजीसीएकडून मोठा दिलासा

  • ४८ तासांत तिकीट विनामूल्य रद्द करू शकता

  • त्याचसोबत तिकिटावरील प्रवासाची तारीख बदलाची सुविधा.

  • हा नियम लागू झाल्यास प्रवाशांना अतिरिक्त शुल्क टाळता येईल

विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नेहमी विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) तिकिटासंदर्भात नवीन नियम जारी केले आहेत. या नियमानुसार, तिकीट बुक केल्यानंतर ४८ तासांच्या आत कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता तिकीट कॅन्सल करू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. या नव्या नियमामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) स्पष्टपणे सांगितले की, या नवीन नियमासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतर हा नियम लागू केला जाईल. जर हा नियम लागू झाला तर विमान प्रवास करणं अधिक सोपं होईल. सध्या तुम्हाला तिकीट कॅन्सल करायची असेल तर त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला फटका बसत आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या नवीन प्रस्तावानुसार, प्रवाशांना बुकिंग केल्यानंतर ४८ तासांचा लुक-इन कालावधी असेल. या काळात ते कोणत्याही शुल्काशिवाय त्यांचे तिकीट रद्द करू शकतील. किंवा त्यांच्या प्रवासाच्या तारखा पुढे ढकलू शकतील. जर नवीन तिकीट जास्त महाग असेल तर त्यांना फक्त भाड्यातील फरक भरावा लागणार आहे. महत्वाचे म्हणजे ही सेवा त्या फ्लाइट्सला लागू होणार नाही ज्या देशांतर्गत विमान तिकीट बुकिंगच्या ५ दिवसांच्या आत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकीट बुकिंगच्या १५ दिवसांच्या आतील आहेत. तसंच, तिकीट हे एजंट किंवा ट्रॅव्हल पोर्टलवरून खरेदी केले पाहिजे हे देखील नवीन नियमांमध्ये नमूद केले आहे.

रिफंडची जबाबदारी एअरलाइन्सची असेल. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हे देखील स्पष्टपणे सांगितले की, एजंट एअरलाइन्सचे ऑथराइज्ड रिप्रेजेंटेटिव्ह मानले जातील. याचा अर्थ असा होतो की, तिकीट कॅन्सल केल्यानंतर रिफंड देण्याची पूर्ण जबाबदारी एजंटची नाही तर एअरलाइन्सची असेल. एअरलाइन्सच्या कामकाजाच्या २१ दिवसांत परतफेड प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यामुळे प्रवाशांना फायदा होईल कारण त्यांना रिफंडसाठी जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन डीजीसीएकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. जर एखाद्या प्रवाशाला आरोग्याच्या समस्येमुळे तिकीट रद्द करावा लागले तर एअरलाइस संपूर्ण रक्कम परत करू शकते किंवा क्रेडिट शेल देऊ शकते. जे नंतर वापरले जाऊ शकते. जर एखाद्या प्रवाशाने बुकिंग केल्यानंतर २४ तासांच्या आत नाव दुरूस्त करण्याची विनंती केली तर त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT