

इंडिगो फ्लाइटला ईमेलद्वारे मानवी बॉम्बची धमकी मिळाली.
धमकीचा मेल आल्यानं खळबळ उडाली आहे.
मुंबई विमानतळावर फ्लाइटचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं.
जेद्दाहून हैदराबादला येणाऱ्या इंडिगो विमानाला मानवी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली. हल्ला होण्याची धमकी मिळाल्यानंतर हैदराबादला जाणारं विमानाचं मुंबई विमानतळावर आत्कालीन लॅडिंग करण्यात आलं. मानवी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर विमानतळ अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली. शनिवारी पहाटे ५:३० च्या सुमारास ही घटना घडली.
इंडिगोच्या अधिकाऱ्यांच्या मते, सकाळी साडेपाच वाजता एक ईमेल आला होता. त्या ईमेलमध्ये इंडिगो फ्लाइट ६ ई ६८ मध्ये मानवी बॉम्ब ठेवण्यात आलाय. प्लाइटला हैदराबादमध्ये उतरवू नये, अशी इशाराही ईमेलमधून देण्यात आला होता. लिट्टे-आयएसआयच्या दहशतवाद्यांनी १९८४ मध्ये मद्रास विमानतळवर स्फोट घडवण्याची योजना बनवली होती. हे दहशतवादी १९८४ च्या मद्रास विमानतळावरील हल्ल्यासारखाच हल्ला करण्याची योजना आखत आहेत. असा दावा या धमकीच्या ईमेलमध्ये करण्यात आला होता, त्यामुळे यंत्रणेत खळबळ उडाली.
धमकीचा ईमेल आल्यानंतर विमानतळावरील सर्व यंत्रणेला याची माहिती देण्यात आली आणि त्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय. तर दुसरीकडे जेद्दाहून हैदराबादला जाणाऱ्या विमानातील वैमानिकांनीही याची सूचना देण्यात आली. त्यानंतर या विमानाचं मुंबई विमानतळावर आपत्कालीन लॅडिंग करण्यात आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.