Railway Rule: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! फक्त या प्रवाशांनाच मिळणार लोअर बर्थ तिकीट, वाचा सविस्तर

Railway New Rule of Lower Berth: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता रेल्वेने लोअर बर्थ तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केले आहेत. यामुळे तुमच्यावर थेट परिणाम होणार आहे.
Railway Rule
Railway RuleSaam Tv
Published On
Summary

रेल्वे प्रवाशांच्या कामाची बातमी

रेल्वे तिकीट बुकिंग प्रक्रिया केली अजून सोपी

लोअर बर्थ तिकीट बुकिंगच्या नियमात बदल

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वे तिकीट बुकिंग प्रक्रिया अजूनच पारदर्शक आणि सोपी बनवण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रेल्वेने रेलवन नावाचे अॅप सुरु केले आहे. यावर तुम्हाला रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व कामे एकाच ठिकाणी करता येणार आहे. यामध्ये तुम्ही आरक्षित आणि अनारक्षित तिकीटदेखील बुक करु शकतात. r

Railway Rule
Chanakya Niti Rules: तुमच्या या गोष्टी कोणालाही सांगू नका, मोठ्या संकटात सापडाल

रेलवन अॅपवर ट्रेनचे लाइव्ह लोकेशन, प्लॅटफॉर्मची माहिती अशा अनेक सुविधा उपलब्ध आबेत. याचसोबत प्रवाशांची नेहमी तक्रार असते की, लोअर बर्थ प्रेफरन्स निवडल्यानंतरही त्यांना साइड अप्पर, मिडल किंवा अपर बर्थ दिले जाते. आता यासाठीच रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेने कॉम्प्टयुटरराइज आरक्षण प्रणालीमध्ये ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील महिला, गर्भवती महिलांना लोअर बर्थसाठी विशेष तरतूद केली आहे. ही सुविधा सीट उपलब्धतेवर अवलंबून असेल.

याशिवाय प्रवाशांना लोअर बर्थ उपलब्ध असेल तर लगेच बुक करा, असा पर्याय दिला जातो. यामुळे जर लोअर बर्थ उपलब्ध नसेल तर तिकीट बुक केले जाणार नाही. यामुळे प्रवाशांना आपल्यानुसार सीट निवडणे सोपे होणार आहे.

जर बुकिंगवेळी लोअर बर्थ नसेल परंतु प्रवासी पात्र असेल तर प्रवासादरम्यान या प्रवाशांना लोअर बर्थ रिकामा करुन देण्याचा अधिकार टीटीईला असतो. रेल्वेने आरक्षित डब्ब्यांमध्ये झोपण्याच्या आणि बसण्याच्या वेळेबाबतचे नियम स्पष्ट केले आहेत.

Railway Rule
Railway Recruitment: १२वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज कसा करावा?

रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत झोपण्याची वेळ आहे. या काळात प्रवास त्यांच्या बर्थनुसार झोपू शकतात. इतर दिवशी त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था आहे. खालच्या बर्थवर आरएसी प्रवासी बसू शकतात.रात्री १० ते सकाळी ६ पर्यंतच लोअर बर्थचे प्रवासी झोपण्यासाठी त्याचा वापर करु शकतात.

रेल्वेने आता आरक्षित तिकिटांसाठी अॅडव्हान्स रिझर्व्हेशन कालावधी १२० दिवसांवरुन ६० दिवस केला आहे. आता प्रवास ६० दिवस आधी तिकीट बुक करु शकतात. हा नियम १ नोव्हेंबरपासून लागू झाला आहे.

Railway Rule
Mumbai Railway Block : एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामासाठी रेल्वेचा ७८ दिवसांचा ब्लॉक, दररोज चार तास लोकल बंद ठेवली जाणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com