Mumbai Local Train Update: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द, वर्ल्डकपशी कनेक्शन

Mumbai Mega Block Update: हार्बर मार्गावरील गाड्या रविवारीच्या वेळापत्रकानुसार चालतील. आता मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्यानं या मार्गावरील लोकल सेवा सुरळीत चालू राहणार आहे.
Mumbai Mega Block Update
Harbour Line Mega Block Cancelled: Local train services between Kurla and Vashi to run as usual on Sunday.saam tv
Published On
Summary
  • कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द

  • मुख्य मार्गावरील मेगा ब्लॉक नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे.

  • महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यानिमित्ताने मेगा ब्लॉक रद्द

लोकलनं प्रवास करणाऱ्यासाठी महत्तवाची बातमी आहे. रविवारी घेण्यात येणारा हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक हा रद्द करण्यात आलाय. अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी दर रविवारी मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर गरजेनुसार मेगा ब्लॉक घेण्यात येतो. मात्र या रविवारी हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आलाय. कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर ११.१० ते ४.१० या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार होता.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – कुर्ला तसेच पनवेल – वाशी या विभागांदरम्यान विशेष उपनगरी गाड्या चालवल्या जाणार होत्या. पण आता मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्यानं या मार्गावरील लोकल सेवा सुरळीत चालू राहणार आहे.

मध्य रेल्वेने मुंबईतील काही स्थानकांदरम्यान उद्या रविवार मेगाब्लॉक जाहीर केला आहे. विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक परिचालीत करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर १०.५५ ते ५.५५ या वेळेत ब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १०.४८ ते ५.४५ या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार या स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील. विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.

मध्य रेल्वेच्या घाटकोपर येथून १०.१९ ते ५.५२ या वेळेत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवले जाणार आहे. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गावरील मेग ब्लॉक का केला रद्द?

रविवार दि. २.११.२०२५ रोजीचा हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यानिमित्ताने रद्द करण्यात आला आहे.मुख्य मार्गावरील मेगा ब्लॉक नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ०२.११.२०२५ रोजी कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. महिला आंतरराष्ट्रीय विश्वचषक उपांत्य सामन्यापूर्वी हा मेगा ब्लॉक नियोजित करण्यात आला होता. आता सामना पाहण्यासाठी प्रवास करणाऱ्या क्रिकेटप्रेमींच्या सोयीसाठी कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यानचा हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com