Google Pay  Saam Tv
बिझनेस

Google Pay युजर्संना मोठा झटका! आता पेमेंट करण्यासाठी मोजावे लागणार पैसे

Google Pay Transction Fee: गुगल पे युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. आता गुगल पेवरुन वीजबिल, पाण्याचे बिल भरण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे.

Siddhi Hande

आजकाल सर्वकाही डिजिटल झालं आहे. अगदी भाजीपाला घेण्यापासून ते महागड्या गोष्टी घेण्यासाठी सर्वजण ऑनलाइन पेमेंट करतात. दरम्यान आता गुगल पे युजर्ससाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गुगल पेवरुन पेमेंट करणे आता महागणार आहे. जर तुम्ही गुगल पेवरुन कोणतेही बिल भरत असाल तर तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागणार आहे.

गुगल पेवरुन वीजबिल, पाणी बिल आणि गॅस बिल भरण्यासाठी जास्त शुल्क आकारले जाणार आहे. या पेमेंटवर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवरील ट्रान्झॅक्शनर करण्यावर सुविधा चार्ज (Convenience Fee) लावण्याची घोषणा केली आहे.

मिडिया रिपोर्टनुसर, यूपीआय बँक अकाउंटच्या मार्फत केलेल्या पेमेंटवर कोणतेही चार्ज लागणार नाही.परंतु इतर माध्यमातून केलेल्या पेमेंटवर चार्ज लागणार आबे.

रिपोर्टनुसार, Google Pay ०.५ % ते १% पर्यंत चार्ज लावणार आहे. यावर जीएसटीदेखील लागू होणार आहे. याआधी मोबाईल रिचार्जवर ३ रुपयांचा सुविधा चार्ज (Convenience Fee)लागायचा. याआधी फोन पे आणि पेटीएमने हा निर्णय घेतला होता. त्यांनी आधी सुविधा चार्ज लावला होता. त्यानंतर आता गुगल पेनेदेखील मोठा निर्णय घेतला आहे.

यूपीआय पेमेंटमुळे अनेक गोष्टी खूप सोप्या झाल्या आहेत. यामुळे डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये नवीन बदल झाले आहेत. यामुळे तुम्ही कधीही आणि कुठेही क्यूआर कोड स्कॅन करुन पेमेंट करु शकतात. डिजिटल पेमेंटमध्ये भारतात ३७ टक्के वाटा हा गुगल पेचा आहे. लाखो लोक रोज गुगल पेचा वापर करतात. यामुळे कोणतेही काम एका झटक्यात होते. तुम्ही लांब असलेल्या व्यक्तीला एका क्लिकवर पैसे पाठवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांची भावना उद्धव ठाकरे यांना समजली, म्हणून त्यांनी तत्काळ कर्जमाफी केली - ओमराजे निंबाळकर

Customer Alert : सावधान! D-Mart मध्ये महिलांना हेरायचा अन् सोनं-पैशावर डल्ला मारायचा, पोलिसांनी सीरियल स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT