Google Pay Cashback : 'गुगल पे'ची एक चूक अन् युजर्स मालामाल; अनेकांच्या खात्यात जमा झाले पैसे, तुम्हाला मिळाले?

Google Pay Error : आज अचानक गुगल पे वापरताना अनेकांच्या खात्यात मोठमोठे कॅशबॅक येऊ लागले. कोणाला १००० रुपये तर कोणाला चक्क ८० हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक आले.
Google Pay Error Cashback News
Google Pay Error Cashback News Saam TV

Google Pay Error Cashback News : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे डिजीटल पेमेंटचा ट्रेंड देखील सतत वाढत आहे. मात्र, वाढत्या डिजीटल ट्रान्झेक्शनसह फसवणुकीच्या अनेक घटना देखील समोर येत आहे. ऑनलाईन पेमेंट करताना एक छोटीशी चूक ग्राहकांना महागात पडू शकते. त्यामुळे मोठा आर्थिक भूर्दंड देखील बसतो. असाच काहीसा प्रकार गुगल पे अकाउंटद्वारे घडला आहे. (Latest Marathi News)

Google Pay Error Cashback News
Mask Rules in Mumbai : कोरोनाचा धोका वाढला; मुंबईत पुन्हा मास्कसक्ती? महापालिका आयुक्तांनी दिल्या महत्वाच्या सूचना

'गुगल पे'ची एक चूक अन् युजर्स मालामाल

देशातील कोट्यवधी लोक गुगलपे वापरतात. त्यांना चांगला कॅशबॅकही मिळतो. मात्र, आज अचानक गुगल पे वापरताना अनेकांच्या खात्यात मोठमोठे कॅशबॅक येऊ लागले. कोणाला १००० रुपये तर कोणाला चक्क ८० हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक आले. अचानक खात्यात पैसे आल्याने अनेकांना आनंद झाला. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. (Breaking Marathi News)

गुगल पेने घेतला कॅशबॅक परत

गुगल पेवर आलेल्या कॅशबॅकचा आनंद साजरा करत असताना ग्राहकांच्या आनंदावर एका क्षणात विरजन पडलं. ज्या युजर्सला कॅशबॅक मिळाल्याचे मॅसेज आले. तसेच ज्या युजर्सच्या खात्यात हजारो रुपये जमा झाले, त्याच युजर्सला गुगलपेने (Google Pay) नंतर एक मेसेज पाठवून ते पैसे परतही घेतले.

Google Pay Error Cashback News
Deepak Kesarkar News : राज्यातील खासगी शाळा सरकार ताब्यात घेणार? शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

गुगल पे युजर्सला कॅशबॅक कसा मिळाला?

दरम्यान, गुगलपेमध्ये आलेल्या टेक्निकल ग्लिचमुळे वारकर्त्यांना मोठा कॅशबॅक मिळत होता. मात्र, कंपनीचा बग, टेक्निकल एरर जसा दुरुस्त झाला, तसं लगेच गुगलपेने अॅपद्वारे पाठवलेले पैसे परत घेतले. कंपनीने लोकांना असा मेसेज पाठवला, की अॅपमध्ये आलेल्या टेक्निकल एररमुळे रिलीज झालेले अमाउंट परत घेत आहोत.

ज्यांनी गुगल पेवर आलेले पैसे खर्च केले, त्यांचं काय?

दुसरीकडे गुगल पे वापरकर्त्यांनी आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्विटरवर लोक आपल्या कॅशबॅक अमाउंचचा स्क्रिनशॉट काढून शेअर करत आहेत. काही लोकांनी गुगलपेवरुन अचानक आलेले पैसे खर्च केले. तर काहींनी ते पैसे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले, त्यांच्याकडे कंपनीचा पैसा अडकला आहे. कंपनीने त्यांच्याकडून पैसे परत घेतले नाहीत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com