UPI Payment Saam Tv
बिझनेस

UPI Payment: ऑनलाइन पेमेंट करताना यापुढे पिन टाकायची गरज नाही; BHIM अ‍ॅपने लाँच केलं नवं फीचर

BHIM App New Feature for UPI Payment: यूपीआयचा वापर कोट्यवधी लोक करतात. यूपीआय पेमेंट करताना आता पिन टाकायची गरज भासणार नाही. तुम्ही फिंगरप्रिंटद्वारे ऑनलाइन पेमेंट करु शकता.

Siddhi Hande

यूपीआय पेमेंट करताना पिनची गरज नाही

फिंगरप्रिंट किंवा फेस रिकग्निशनद्वारे करु शकणार पेमेंट

BHIM अॅपने सुरु केली नवी सुविधा

सध्या अनेकजण ऑनलाइन पेमेंटचा वापर करतात. काहीही खरेदी करायचे असेल तर ऑनलाइन पेमेंच करतात. आता BHIM अॅपमध्ये ऑनलाइन पेमेंटसाठी नवीन फीचर लाँच केले आहे. बायोमेट्रिक फीचरमुळे खूप फायदा होणार आहे. आता तुम्ही कोणताही यूपीआय पिन टाकून पेमेंट करु शकतात. तुम्हाला फेस किंवा फिंगरप्रिंट लॉकने पेमेंट करण्याची परवानगी दिली आहे.

आता तुमचे ऑनलाइन पेमेंट खूप सोपे होणार आहे. आता तुम्हाला फक्त फिंगरप्रिंटद्वारे पेमेंट करता येणार आहे. ५००० रुपयांपर्यंतचे पेमेंट करण्यासाठी हे नवीन नियम आहेत. यासाठी फक्त फिंगरप्रिंट किंवा फेस लॉकचा वापर करा.

अनेकदा लोक पिन विसरतात. यामुळे पेमेंट फेल होते. याचसोबत तुम्ही जास्त वेळा चुकीचा पिन टाकला तर अडचणी येऊ शकतात. त्यामुळेच ही सुविधा फायदेशीर आहे.

भीम अॅपचे हे फीचर अँड्रॉइड आणि iOS दोन्ही डिव्हाइसवर काम करणार आहे. यावर तुम्हाला फिंगरप्रिंट आणि फेस रिकग्निशन सुविधा मिळणार आहे. हे फीचर सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगले आहे. फिंगरप्रिंट आणि फेस प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. त्यामुळे पेमेंट करणे खूप सुरक्षित असणार आहे. तुमच्यासोबत फ्रॉड होण्याची शक्यता खूप कमी असते.

कसं सुरु करायचं?

तुम्हाला सर्वात आधी भीम अॅप ओपन करायचे आहे. त्यानंतर प्रोफाइलमध्ये जायचे आहे. तिथे तुम्हाला बँक अकाउंट निवडून बायोमेट्रिक ट्रान्झॅक्शनचा ऑप्शन ऑन करायचा आहे. यानंतर तुम्ही फिंगरप्रिंटद्वारे पेमेंट करु शकणार आहात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mugache Cutlet Recipe: झटपट नाश्ता हवा? 10 मिनिटांत बनवा मुगाचे टेस्टी कुरकुरीत कटलेट, वाचा रेसिपी

Maharashtra Vidhansabha Seats: मोठी बातमी! महाराष्ट्रात विधानसभेच्या आता ४३२ जागा होणार?

जहाजावर कॅप्टन म्हणून घेणारा भोंदूबाबा निघाला दहावी 'फेल'; तथाकथित अंकशास्त्रतज्ञ गणितात नापास

Aamir Khan : ६०व्या वर्षी आमिर खान बोहल्यावर चढणार, गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा? दोघांच्या 'त्या' VIDEO मुळे चर्चा

LPG Gas Booking Rules : टेन्शन वाढवणारी बातमी! LPG सिलिंडरच्या बुकिंगसाठी आता २५ नाही ३५ दिवसांची वाट पाहावी लागणार; काय आहेत नवीन नियम?

SCROLL FOR NEXT