UPI payments: आता पिन न टाकताही होणार UPI पेमेंट; आलं नवं फिचर

Surabhi Jayashree Jagdish

डिजिटल पेमेंट

PhonePe, Google Pay, Paytm आणि BHIM सारख्या लोकप्रिय UPI अ‍ॅप्समुळे व्यवहार खूप सोपे झालेत. यूजर्सना आता पैसे पाठवणं आणि घेणं अधिक जलद आणि सोयीस्कर झालंय.

biometric authentication

UPI पिनची गरज कमी होणार

आता प्रत्येक वेळी UPI पिन टाकण्याची गरज राहणार नाही. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनचा नवीन फीचर हळूहळू सर्व यूजर्ससाठी सुरू होतेय. यामुळे पेमेंट प्रक्रिया अधिक वेगवान आणि सहज होणार आहे.

UPI security

NPCIची महत्त्वाची भूमिका

या अपडेटमागे National Payments Corporation of India ची मोठी भूमिका आहे. NPCI ने UPI प्लॅटफॉर्मवर बायोमेट्रिक पेमेंटला मंजुरी दिली आहे.

biometric security

iPhone यूजर्सनाही सुविधा

पूर्वी हा फीचर फक्त काही अ‍ॅप्स आणि Android यूजर्सपुरता मर्यादित होता. आता ही सुविधा iPhone वापरणाऱ्यांसाठीही उपलब्ध झालीये. यामुळे अधिक लोकांना या सुविधेचा फायदा घेता येणार आहे.

UPI apps

५,००० रुपयांपर्यंत पेमेंट

लहान रकमेच्या व्यवहारासाठी बायोमेट्रिक वापरता येईल. जर तुम्ही ५,००० रुपयांपर्यंत पेमेंट करत असाल, तर फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी पुरेसा आहे. यामुळे व्यवहार अधिक जलद आणि सेक्युर होणार आहे.

UPI new feature

Android आणि iPhone मध्ये पर्याय

Android यूजर्सना फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक दोन्ही पर्याय मिळतात. iPhone वापरणारे फेस आयडीद्वारे सहज पेमेंट करू शकतात.

UPI new feature

फीचर कसं सुरू कराल?

सर्वप्रथम तुमचं UPI अ‍ॅप लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करा. नंतर सेटिंगमध्ये जाऊन बायोमेट्रिक किंवा फेस आयडी पेमेंट पर्याय सुरू करा. एकदा सुरू झाल्यावर पेमेंट करताना पिनऐवजी बायोमेट्रिक पर्याय दिसेल.

mobile payments

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

Raigad fort history | saam tv
येथे क्लिक करा