Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार

Marathi Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस, विदर्भात पावसाचा इशारा, शिवसेना सुनावणी, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू.

पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. नांदेड शहरातील विष्णुनगर मधील रोड नंबर 26 वर ही घटना घडली. मानसी संजय जाधव असे मयत झालेल्या युवतीचे नाव आहे.मानसी आपल्या स्कुटीवरून जात असताना रेल्वे विभागाच्या पिकअप जिपने धडक दिली. जीपच्या चाकाखाली आल्याने मानसीचा जागीच मृत्यू झाला.

Maharashtra News Live Update: नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार

नवी मुंबईतील बचत गट आणि घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई मनपाचे सभागृह नेते सागर नाईक यांनी लखपती दीदी योजना राबविण्याची घोषणा केलेय. केवळ घरगुती उत्पादनावर न थांबता उत्पादनाला विक्रीसाठी देशभरात योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न मनपा करणार आहे. येणाऱ्या महासभेकडे लक्ष असुद्या लखपती दीदी योजना आणणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महापालिका असेल असा विश्वास व्यक्त करत या योजनेच्या माध्यमातून अनेक महिला लखपती होतील अशी प्रतिक्रिया सागर नाईक यांनी व्यक्त केलेय.

अस्वच्छतेसह तब्बलं 7 त्रुटी आढळल्या; ब्लिंकिटचा परवाना निलंबित

अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केलाय.. सहायक आयुक्त देवानंद वीर यांच्या मार्गदर्शनाखाली या पेढीची प्रत्यक्ष तपासणी केली होती. या तपासणीत पेढीच्या गोदामात व कामाच्या ठिकाणी अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. मात्र, फेरतपासणीतही पेढीने या गंभीर त्रुटींची पूर्तता केली नसल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर प्रशासनाने त्यांचा अन्न परवाना निलंबित करण्याचा कठोर निर्णय घेतला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा निष्काळजीपणाविरुद्ध यापुढेही कठोर मोहीम सुरूच राहील, असा इशारा यावेळी दिलाय

भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम

अमरावतीच्या मेळघाटातील डोमा आदिवासी निवासी मुलींच्या आश्रमशाळेत भुताची अफवा पसरल्याने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह प्रशासनाने शाळेत अर्धी रात्र मुक्काम केला. यावेळी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या मनातील भीती आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांन सोबत जेवणही केले.जुन्या वस्तीगृहातून शाळेच्या नवीन सुसज्ज इमारतीत मुलींचे वसतिगृह स्थलांतरित करण्यात आले असून, येथे सुमारे ३०० मुलींच्या निवासाची व्यवस्था आहे. मात्र भुताच्या अफवेमुळे मुली अद्याप रात्री वसतिगृहात राहण्यास घाबरत आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांनी न भिती शाळेमध्ये यावं असं आवाहन करण्यात आलं आहे, तर विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी सप्तखंजेरीवादक संदीप पाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाचे आयोजन करण्यात आले.जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह आमदार केवलराम काळे,प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित होते. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली.

यवतमाळ जिल्ह्यात अगस्टमध्ये पावसाचा फ्लाॅप शो

यंदाच्या पावसाळ्यात वरूनराज्याची यवतमाळ जिल्ह्यावर अवकृपा कायम असून ऑगस्ट महिन्यात पावसाने अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र असून ऑगस्ट महिन्यात 253 मि.मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ 55 मि.मी. पावसाची नोंद झालीये,त्यामुळे महिन्याभरातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत अवघा 21 टक्के पाऊस झाला त्यामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडलाय.

अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई

अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवरून अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.. निकृष्ट जेवण आणि मेसमधील अस्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एफडीएने गेल्या 6 महिन्यांत तब्बल तिसऱ्यांदा धाड टाकली..

तपासणीदरम्यान मेसमध्ये निकृष्ट धान्य, अस्वच्छता, शिवाय कॅन्टीन एका व्यक्तीच्या नावावर असताना प्रत्यक्षात दुसऱ्याच व्यक्तीकडून चालवली जात असल्याचे आढळून आले. यापूर्वीही कारवाई करून मेस सील करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा मेस सुरू असल्याचे समोर आले.

माढा तालुक्यातील रस्त्यासाठी 100 कोटींच्या निधीची घोषणा

माढा तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 100 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणा ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.

जानेवारी मध्ये या कामांचे भूमिपूजन केले जाईल असे यावेळी गोरे यांनी स्पष्ट केले.

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या अमृत महोत्सव सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी आमदार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com