Manasvi Choudhary
मंगळसूत्र हे केवळ एक दागीना नसून पती- पत्नी दोघांच्या प्रेमाचे, विश्वासाचे प्रतीक आहे म्हणून लग्नानंतर महिला पतीच्या नावाचे मंगळसूत्र गळ्यात घालतात.
आजकाल मंगळसूत्रामध्ये अनेक डिझाईन्स उपलब्ध आहेत. तुम्ही देखील खास नवऱ्याच्या नावाचे पर्सनलाईज्ड मंगळसूत्र डिझाईन निवडू शकता.
तुमच्या जोडीदाराच्या नावाचे मंगळसूत्र तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खालील डिझाईन्स नक्की ट्राय करा.
इनिशियल लेटर पेडंट डिझाईन सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. यामध्ये पूर्ण नावाऐवजी नवरा आणि बायकोच्या नावाचे फक्त पहिले अक्षर लिहलेले असते.
जर तुम्हाला अस्सल मराठमोळा पॅटर्न हवा असेल तर तुम्ही मराठी भाषेत सुंदर डिझाईन्समध्ये मंगळसूत्र निवडू शकता. साडी किंवा ड्रेसवर पतीच्या नावाचे हे डिझाईन अधिक उठून दिसते.
एका बाजूला नवऱ्याचे आणि दुसऱ्या बाजूला बायकोचे संपूर्ण नाव इंग्रजी किंवा मराठीत लिहलेले मंगळसूत्र तुम्ही बनवून घेऊ शकता.
प्रेमाचे प्रतीक असलेल्या हार्ट शेपच्या डिझाईनमध्ये तुम्ही नवरा आणि बायकोची नाव असलेले पहिले लेटर मंगळसूत्रासाठी निवडू शकता. हे युनिक पॅटर्न सध्या ट्रेंडमध्ये आहे.
'इन्फिनिटी' मंगळसूत्र डिझाईन तुम्ही निवडू शकता. इन्फिनिटी चिन्हात दोन नावे जोडलेली डिझाईन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.