Manasvi Choudhary
हिंदू संस्कृतीत विवाहित स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्राला विशेष महत्व आहे. मंगळसूत्र हे केवळ एक दागीना नसून ते स्त्रीच्या सौभाग्याचे आणि पती-पत्नीच्या पवित्र प्रेम-विश्वासाचे प्रतीक मानले जाते.
मात्र आता काळ बदलला तशी दागिन्यांची फॅशनही बदलली असून, आजकाल महिलांना जड आणि मोठे मंगळसूत्र घालण्याऐवजी हलके आणि स्टायलिश डिझाईन्स अधिक आवडतात.
तुम्हालाही कमी किंमतीत स्टायलिश पॅटर्नमध्ये मंगळसूत्र हवे असेल तर तुम्ही १० ग्रॅम सोन्यामध्ये सुंदर आणि आकर्षक मंगळसूत्र बनवून घ्या. त्यासाठी आम्ही काही डिझाई्न्स सांगणार आहोत त्या पाहा.
जर तुम्हाला पारंपारिक जाड काळ्या मण्यांचे मंगळसूत्र नको असेल, तर तुम्ही दोन्ही बाजूंना सोन्याचे मणी आणि मोजकेच काळे मणी असा मॉडर्न लूक निवडू शकता. हे वजनाला अतिशय हलके आणि दिसायला क्लासी दिसते.
आजकाल सोन्याच्या साखळीचे मंगळसूत्र प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. बारीक आणि आकर्षक सोन्याची चैन आणि त्यात अगदी लहान डिझाईनचे पेंडंट, असा हा लूक ऑफिसवेअरसाठी एकदम परफेक्ट आहे.
जर तुम्हाला थोडासा ग्लॅमरस आणि शिमरी लूक हवा असेल, तर डायमंड कट चैन मंगळसूत्र बेस्ट आहे. यामध्ये सोन्याच्या चेनवर डायमंड कटिंग केलेली असते, ज्यामुळे ती खऱ्या हिऱ्यासारखी चमकते.
पारंपारिक आणि आधुनिक असा दोन्हीचा सुंदर मेळ साधून हे डिझाईन तयार केले जाते. यात सोनेरी मण्यांच्या डिझाईन्ससोबत काळ्या मण्यांचा वापर केला जातो, जे साडी किंवा वेस्टर्न ड्रेस दोन्हीवर उठून दिसते.
जर तुम्हाला सिंगल चेन वापरून कंटाळा आला असेल, तर तुम्ही डबल लेयर चैन मंगळसूत्र निवडू शकता. यात दोन पातळ साखळ्या असलेला नाजूक पॅटर्न असतो, जो १० ग्रॅमच्या वजनात अगदी दिसायला भरभक्कम आणि सुंदर वाटतो.