Saam Tv
पुरेशी झोप घेऊन देखील थकल्यासारखे वाटत असेल, सतत सुस्ती येत असेल, तर ही लक्षणे थायरॉईडची असतात.
खाण्यापिण्यात कोणताही बदल नसताना, वजन वाढत असेल तर, त्यामागे हायपरथायरॉडिझम असू शकते.
केस नेहमीपेक्षा जास्त गळत आहेत. केस पातळ झाले असतील तर ही लक्षणे थायरॉईडची असतात. थायपरॉईडमुळे केसांच्या वाढीवर मोठा परिणाम होतो .
साधारण वातावरणातही जर थंडी जाणवत असेल तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. हे लक्षण हायपरथायरॉडिझमचे असू शकते.
अचानक त्वचेत बदल जाणवणे. त्वचा जर कोरडी, निस्तेज,खरखरीत वाटू लागली तर हे थायरॉईडचे लक्षण आहे.
हायपरथायरॉडिझम असेल तर सांधे , हाडे अधिक दुखू लागतात . त्यामुळे या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.