Saam Tv
मलाई कुल्फीसाठी १ लीटर क्रिम दूध, ४ ते ५ चमचे साखर, २ चमचे मिल्क पावडर, वेलची पावडर, बारीक चिरलेले बदाम आणि पिस्ते.
जाड भांड्यात दूध गरम करा. गॅसची आच मध्यम असूद्या. तळाला लागू नये म्हणून ढवळत राहा.दूध जसजस घट्ट होईल तस चव वाढेल आणि क्रिमी होईल.
दूध घट्ट झाल्यानंतर त्यात मिल्क पावडर आणि साखर घाला. गुठळ्या होऊ नयेत म्हणून मिश्रण सतत ढवळत राहा.
आता त्यात वेलची पावडर आणि बारीक चिरलेले बदाम- पिस्ते घाला. यामुळे कुल्फीला छान सुगंध आणि कुरकुरीत टेक्शचर मिळेल.
गॅस बंद करून कुल्फीचा मिश्रण थंड होऊ द्या. गरम मिश्रण थेट फ्रिजमध्ये ठेवू नका.
मिश्रण कुल्फीच्या मोल्डमध्ये भरा. मोल्डवर झाकण लावा किंवा फॉईलने झाकून घ्या.
कुल्फी किमान ७ ते ८ तास फ्रिजमध्ये ठेवा. पूर्णपणे सेट होऊ द्या.
घरच्या घरी क्रिमी, थंडगार, स्वादिष्ट मलाई कुल्फी झाली तयार.