siddhivinayak bhagyalakshmi yojana Saam tv
बिझनेस

Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana : सिद्धिविनायक पावणार; लाडकीला 10 हजार मिळणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती, VIDEO

Siddhivinayak Bhagyalakshmi Yojana news : राज्य सरकारच्यावतीने लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली...यासह सरकारच्यावतीने स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना,लेक लाडकी योजनाही राबवण्यात येतात. आता यासह भाग्यलक्ष्मी योजनाही राबवण्यात येणार आहे. कोण आणि कशी राबवली जाणार ही योजना पाहूया...

Tanmay Tillu

राज्य सरकारच्यावतीने लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड कौतुकाची ठरली. महायुतीचं सरकार स्थापन होण्यास ही योजना गेमचेंजर ठरली. दरम्यान, सरकारच्यावतीने स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना राबवण्यात येते. योजनेत पहिल्या मुलीवरच समाधान मानणाऱ्या पालकांना 50 हजार रुपयांचं अनुदान शासनातर्फे देण्यात येतं.. तर, लेक लाडकी योजनाही सुरू करण्यात आली. त्यामध्ये, मुलीला वयाच्या 18 वर्षापर्यंत 75,000 रुपयांचे मदत शासनातर्फे दिली जाते. मात्र आता भाग्यलक्ष्मी योजनाही आणण्यात येणार आहे...काय आहे ही योजना पाहूया..

भाग्यलक्ष्मी योजनेची वैशिष्ट्य

- मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन, शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं

-राज्यातील शासकीय रूग्णालयात जन्माला आलेल्या मुलींना लाभ

- मुलींच्या नावे 10,000 रुपयांचे फिक्स डिपॉझिट आईच्या नावे ठेवणार

दरम्यान, ही योजना सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून सामाजिक उपक्रमांतर्गत राबविण्यात येतेय. श्री सिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक नुकतीच पार पडली. या वर्षात न्यासाचे उत्पन्न 133 कोटींच्या घरात गेलं..याच अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शासकीय रूग्णालयात जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी "श्रीसिध्दिविनायक भाग्यलक्ष्मी योजना" राबविण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आलायं.श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना' ही राज्यातील मुलींसाठी एक आशादायी पाऊल ठरणार एवढं नक्की..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT