Group Clash in Bareilly : ईदच्या दिवशी मोठा राडा; दोन गटात दगडफेक अन् गोळीबार

Group Clash in Uttar pradesh : ईदच्या दिवशी उत्तर प्रदेशच्या बरेलीत मोठा राडा झाला. दोन गटाच्या वादानंतर दगडफेक आणि गोळीबार झाला.
uttar pradesh News
uttar pradesh Saam tv
Published On

उत्तर प्रदेशच्या बरेलीत ईदच्या दिवशी दोन गटात मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. दोन गटात राडा झाल्यानंतर एका समुदायावर गोळीबार झाला. या गोळीबारात तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळावर नियंत्रण आणलं.

uttar pradesh News
buldhana : बुलढाणा हादरलं; पोलीस कर्मचाऱ्याला गळा आवळून संवपलं, बंद कारमध्ये आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीच्या इज्जतनगर पोलीस ठाण्याच्या मुडिया अहमदनगर परिसरात ही घटना घडली आहे. एका तरुणाने मुलीला फूस लावून पळवून नेल्याने राडा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर एका जमावाने तरुणाच्या घरात जाऊन विचारणा केली. त्यावरून दोन गट भिडले. दोन्ही गटाचा वाद पेटल्यानंतर परिस्थिती चिघळली.

uttar pradesh News
Maharashtra Rain : राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; ऐन रब्बी हंगामात बळीराजाला रडवलं

जमावावर गोळीबार, तिघे जखमी

दोन गटात राडा झाल्यानंतर एका गटाने गोळीबार केला. त्यानंतर दुसऱ्या गटाने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. या घटनेत तिघे जखमी झाले. गोळीबारात तिघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. दोन गटात राडा झाल्यानंतर बड्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात केली.

uttar pradesh News
New Rules : गॅस सिलिंडर, UPI आणि बँक...;1 एप्रिलपासून नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष महागात पडणार, जाणून घ्या महत्त्वाचे बदल

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशच्या बरेलीत सोमवारी दोन गटात राडा झाला. दोन्ही गटाने एकमेकांवर दगडफेक केली. दोन गटातील वाद चिघळल्यानंतर एक गटाने थेट जमावावर गोळीबार केला. या गोळीबारात एका गटातील तिघे जण गंभीर जखमी झाले. या जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तिन्ही गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन गटात राडा झाल्यानंतर पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. त्यानंतर घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com