Beti Bachao Beti Padhao Saam Tv
बिझनेस

Beti Bachao Beti Padhao : मुलींसाठी सरकारची खास योजना! २१ व्या वर्षी मिळतील तब्बल ६ लाख, जाणून घ्या सविस्तर!

Beti Bachao Beti Padhao Scheme Benefits: सरकारची मुलींसाठी एक खास योजना आहे. या योजनेअंतर्गत मुलीला वयाच्या २१ व्या वर्षी ६ लाख रुपये मिळतात. यासाठी मुलींच्या पालकांना दर महिन्याला ठरावीक रक्कम जमा करावी लागणार आहे.

Siddhi Hande

सरकारने अनेक योजना नागरिकांच्या हितासाठी राबवल्या आहेत. यात अनेक योजना महिला, ज्येष्ठ नागरिका, लहान मुले आणि शिक्षणासाठी आहेत. आजही देशात अनेक ठिकाणी मुलींना शिक्षण दिले जात नाही. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजून सांगण्यात येत नाही. त्यामुळेच सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना राबवली आहे. या योजनेत मुलींनादेखील मुलांसोबतच शिक्षण करण्याची योग्य संधी मिळते.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, त्यांच्या कौशल्याचा विकास करणे, मासिक पाळी किंवा बालविवाहाबाबत जागृकता निर्माण करण्याचे काम केले जाते.

'बेटी बचाओ बेटी पढाओ' ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१५ मध्ये सुरु केली. या योजनेत मुलींच्या शिक्षणाबाबत जागृकता केली जाते. या योजनेअंतर्गत मुलींचे खाते उघडावे लागते. त्यात मुलीचे आईवडिल दरमहिन्याला १००० रुपये जमा करु शकतात किंवा वर्षाला १२००० रुपये जमा करु शकतात. आई वडिलांची इच्छा असल्यास ते पैसे जमा करु शकतात.

या योजनेअंतर्गत १४ वर्ष पूर्ण झाल्यानंतर १,६८,००० रुपये जमा केले जातात. यात मुलगी २१ वर्षांची झाल्यावर तिला ६,०७,१२८ रुपये दिले जातील. हे पैसे मुलगी उच्च शिक्षणापासाठी वापरु शकते.ती या योजनेतून पैसे काढू शकते.या पैशांचा वापर ती शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी करु शकते.

कोण लाभ घेऊ शकणार?

'बेटी बचाओ बेटी पढाओ'या योजनेसाठी एका कुटुंबातील फक्त दोनच मुली अर्ज करु शकतात. या मुलींचे वय १० वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. याचसोबत मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते असणे बंधनकारक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhar Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

SCROLL FOR NEXT