Manasvi Choudhary
हिंदू धर्मात अधिक मास हा अत्यंत पवित्र मानला जातो. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या पवित्र महिन्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज १५ जून २०२६ अधिक मासच्या शेवटच्या दिवशी सोमवती अमावस्या असण्याचा एक दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे.
शास्त्रानुसार, अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी दान धर्म केल्याने देखील चांगले फळ मिळते माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.
अधिक मास आणि सोमवती अमावस्या एकाच दिवशी येणे हा एक महासंयोग आहे. शास्त्रांनुसार, या दिवशी केलेले दानधर्म, पूजा आणि दीपदान हे अधिक लाभदायक ठरते.
अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी दीपदानाला महत्व आहे. या दिवशी ३३ वातींचा एक विशेष दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. हिंदू धर्मात '३३' हा आकडा ३३ कोटी देवतांचे प्रतीक मानला जातो.
हा अधिक मासाचा शेवटचा दिवस असल्याने माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. संध्याकाळी लक्ष्मी स्त्रोताचे पठण करा.
हिंदू धर्मात, तुळशीचे रोप देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आजच्या दिवशी तुळजीवर दिवा लावा आणि प्रदक्षिणा घाला.
अधिक मास या पवित्र दिवशी दानधर्माला विशेष महत्त्व आहे. आज गरजू आणि गरीब लोकांना अन्न, वस्त्र आणि फळे दान करा
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.