EPFO कर्मचाऱ्यांना मिळते ६ वेगवेगळ्या प्रकारची पेन्शन; तुम्ही कोणत्या निवृत्तीवेतनासाठी पात्र? लगेच चेक करा

EPFO Pension: संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळते. यासाठी पेन्शनची रक्कम EPF अकाउंटमध्ये जमा केली जाते. कंपनी आणि कर्मचारी यासाठी काही निश्चित रक्कम जमा करतात.
EPFO
EPFO Saam Tv
Published On

भारतात प्रत्येक कर्चाऱ्यांना पीएफ मिळतो. जो व्यक्ती एखाद्या कंपनीत किंवा संघटित काम करतो तो व्यक्ती ईपीएफओचा सदस्य असतो. ईपीएफओ म्हणजे भविष्य निर्वाह निधी संघटना. भविष्य निर्वाह निधीत कर्मचाऱ्याचा विमा आणि निवृत्ती वेतन देण्यात तरतूद असते. ईपीएफओमध्ये कर्मचारी आणि कंपनी दोघेही काही निश्चित रक्कम जमा करतात.

EPFO ही सरकारी संस्था आहे जी भारत सरकारद्वारे चालवली जाते. EPFO खात्यात पगाराच्या १२ टक्के रक्कम जमा केली जाते. यात ८.३३ टक्के भाग हा पेन्शन फंडाच्या नावाने जमा केला जातो. तर ३.६७ टक्के भाग कर्मचारी भविष्य निधीत जमा केला जातो. नोकरी सोडल्यानंतर ईपीएफओकडून कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पेन्शन मिळते. (EPFO)

EPFO
Unified Pension Scheme: शिंदे सरकारचा मोठा निर्णय , केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळणार, महाराष्ट्र पहिलेच राज्य!

EPFO मध्ये कर्मचाऱ्यांना ६ प्रकारची पेन्शन मिळते (EPFO Pension Scheme)

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा मिळतो. यासाठी वयाची ५८ वर्ष पूर्ण झालेली असावीत किंवा संघटित क्षेत्रात काम करुन १० वर्ष पूर्ण झाली असावीत. त्याच कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो.

१. निवृत्ती वेतन

एखादा कर्मचारी संघटित क्षेत्रात १० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वेळ काम करत असेल. त्या व्यक्तीने ५८ वय पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती घेतली तर त्यांनी सेवानिवृत्त वेतनाचा लाभ मिळतो.

२. लवकर पेन्शन (Early Pension)

जर एखाद्या कर्मचाऱ्याने संघटित क्षेत्रात १० वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले आहे आणि त्या व्यक्तीने ५८ वय पूर्ण होण्याआधीच निवृ्त्ती घेतली तर त्या व्यक्तीला लवकर पेन्शन मिळते.

३. अपंगत्व निवृत्ती पेन्शन

EPS95 च्या नियमानुसार, जर एखादा व्यक्ती संस्थेत काम करत असताना त्याला अपंगत्व आले. तो व्यक्ती काम करण्यास असक्षम असेल त्याला अंपगत्व निवृत्ती वेतनाद्वारे आर्थिक मदत केली जाते.

EPFO
2000 Note Exchange RBI : 2000 रुपयांच्या नोटांवर मोठी अपडेट, स्वतः रिझर्व्ह बँकेनेच कोर्टात सांगितले, ही नोटबंदी नाहीच!

४. विधवा किंवा मुलांसाठी पेन्शन

जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळते.EPFO सदस्याच्या जोडीदाराला म्हणजे पती किंवा पत्नीला मासिक पेन्शन दिली जाते. याचसोबत EPS95 अंतर्गत २५ वर्षांपर्यंतच्या दोन मुलांना मासिक पेन्शन मिळते.यातून त्यांचे शिक्षण होऊ शकते.

५. अनाथ पेन्शन

जर ईपीएफओ सदस्याचा मृत्यू झाला आणि त्या व्यक्तीच्या जोडीदाराचाही मृत्यू झाला तर त्यांच्या मुलांना अनाथ पेन्शन दिली जाते.

६. नॉमिनी पेन्शन

जर एखाद्या ईपीएफओ सदस्याला पत्नी आणि मुले नसतील तर तो व्यक्ती ज्याला कोणाला नॉमिनी करतो त्याला पेन्शन दिली जाते.मासिक पेन्शनच्या अर्धे पैसे नॉमिनीला दिले जातात.

EPFO
Kisan Vikas Patra Scheme: ५ लाख रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; काय आहे किसान विकास पत्र योजना?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com