

नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने नांदेड शहरातून मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते.
"साम टीव्ही"च्या बातमीचा इंपॅक्ट
पुण्यातील "त्या" मिठाई दुकानाचा परवाना अखेर रद्द करण्यात आलाय
पेढे खाऊन विषबाधा झाल्याच्या घटनेचा अन्न व औषध प्रशासनाची दखल
पुण्यात पेढे खाऊन ७ जणांना झाली आहे विषबाधा
पेढे खरेदी केलेल्या गुरुनानक डेअरी अॅन्ड स्वीटस चा परवाना रद्द तसेच व्यवसाय बंद करण्याच्या सूचना
आज झालेल्या कामकाज सल्लागार समिती बैठकीत निर्णय
अमरावती शहरात सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली आहे,या पावसानं शेतकरी राजा आनंदीत झाला आहे, काल सुद्धा रात्री जोरदार पाऊस पडला होता सलग दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यात पावसाने बॅटिंग केल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढनार आहे, आज प्रचंड गर्मीने नागरिक हैराण झाले होते, जूनचा दुसरा आठवडा उलटूनही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही.. आज केवळ अमरावती शहरात पाऊस पडला,मात्र ग्रामीण भागात हा पाऊस नाही
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या आहे. दरम्यान एकेकाळी अण्णाचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोन आला का हा प्रश्न विचारला असता अरविंद आता दूर गेलाय अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर समाजसेवक असलेल्या अण्णांनी पंजाब निवडणुकीवर बोलतांना सांगितलं की पक्ष आणि पार्ट्या यांनी निवडणुका करा पण सेवाभाव जपला गेला पाहिजे...मुख्य उद्देश सेवा आहे पण त्याचा अर्थ वेगळा लागला आणि त्यातून मतभेद निर्माण झाले आणि पार्ट्या निर्माण झाल्या खरंतर पक्ष आणि पार्ट्या घटनेमध्ये नाही वास्तविक राजकारणाचा मुख्य उद्देश सेवा आहे.सेवेचा अर्थ निष्काम कर्मा आहे अण्णा हजारे सारखे सगळे करू शकत नाही माझा राजकारणी लोकांना एकच संदेश आहे सेवाभाव जपा अशी प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी दिली आहे....
पिंपरी-चिंचवडमधील संभाजीनगर, चिंचवड येथील चेतना हॉस्पिटलमध्ये रुग्ण महिलेच्या विनयभंगाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ऑपरेशननंतर तपासणीच्या बहाण्याने अश्लील चाळे केल्याप्रकरणी डॉक्टर धैर्यशील शेटक (वय 27) याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. 37 वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, रविवारी हा प्रकार घडला. महिलेने कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर रुग्णालयात गोंधळ उडाला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पुण्यात बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी पक्षफोडीच्या चर्चांवर भाष्य करत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. बैठकीसाठी ऑनलाइन सहभागी झाल्यास त्यात काहीच गैर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विरोधकांवर निशाणा साधताना, "तुमाने यांनी आधी निवडणूक जिंकून दाखवावी," असे आव्हान दिले.
अभिजीत दिपके यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ऑल इंडिया पँथर सेना निषेध करत आहे. हा हल्ला भयभीत करण्यासाठी होता. केंद्र सरकार अभिजीत दिपकेचा बेनझीर भुटो होण्याची वाट बघत आहे का? तात्काळ अभिजीत दिपकेला झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत तीन बैलांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीत गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य आणि जनावरांचा चारा जळून खाक झाला. प्राथमिक पंचनाम्यानुसार सुमारे ६ लाख ३८ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा पूर्ण केला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
नवी मुंबईतील एका नियोजित कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्याने शिवसेना नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका मुख्यालयात खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांची महत्त्वाची बैठक सुरू आहे. आगामी महापालिका महासभेत भाजपला कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील बसलेगाव रोडवरील खडीमशीनच्या डोहात बुडालेल्या सागर बनसोडे (रा. बनजगोळ) याचा मृतदेह सोमवारी सकाळी ११.३९ वाजता शोधमोहिमेदरम्यान सापडला. रविवारी सायंकाळी पोहण्यासाठी गेलेल्या सागरला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने रात्रभर शोधकार्य सुरू ठेवले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने बनजगोळ गावात हळहळ व्यक्त होत आहे.
आज राज्यभरात अनेक ठिकाणी 15 जून शाळा सुरू होत असून शाळेचा पहिला दिवस आणि घंटा वाजणार असल्याने बीडच्या परळी शहरात संस्कार शाळेकडून विद्यार्थ्यांचे आनंदमय वातावरणात पहिला दिवस जावो म्हणून अनोखा स्वरूपाचा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये शाळेच्या गेट वरती फुलांची सजावट नाचणारा टेडी आणि एक गुलाब विद्यार्थ्यांना देऊन स्वागत करण्यात आले. या अशा अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस हा आनंदमय झाला असून विद्यार्थ्यांवर कसलेही शाळेच्या पहिल्या दिवसाचे मनावरती ओझे राहिले नसून पहिला दिवस एक गुलाब स्माईल आणि नृत्य अशा स्वरूपात विद्यार्थ्यांनी साजरी केला.
अमरावतीतील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवरून राज्य शासन गंभीर झाल्याचे चित्र समोर आले आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्य नोडल अधिकारी डॉ. स्वप्नील सांगळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालयासह विविध आरोग्य संस्थांची पाहणी करून व्यवस्थेची झाडाझडती घेतली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीतील आरोग्य संस्थांच्या दुरवस्थेबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लक्ष वेधल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पाहणीदरम्यान स्वच्छतेचा अभाव, जर्जर इमारती, मनुष्यबळाची कमतरता आणि अन्य मूलभूत त्रुटी आढळून आल्या. यासंदर्भातील सविस्तर अहवाल लवकरच आरोग्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतर संबंधितांवर कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे.
मलकापूर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना १४ ते १५ दिवसांनी पाणी मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरातील करदाते नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत असताना नगरपरिषद प्रशासन हद्दीबाहेरील वस्त्यांमध्ये पाईपलाईन टाकत असल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेने केला आहे. या प्रकाराविरोधात शिवसेनेने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत बेकायदेशीर पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा थेट इशाराही देण्यात आला आहे....
सातपुड्याच्या दुर्गम डोंगराळ भागात तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या शैक्षणिक वर्षाचा अत्यंत उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या दुर्गम भागातील शाळेत पहिल्यांदाच राज्याचे शिक्षण मंत्री पोहोचल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. यावेळी मंत्री दादा भुसे आणि आमदार आमश्या पाडवी यांनी स्वत शाळेची घंटा वाजवून नव्या सत्राची सुरुवात केली. दुर्गम भागातील आदिवासी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत मंत्री महोदय आणि आमदारांनी त्यांच्या हातात नवीन वह्या, पेन आणि दप्तर सुपूर्द करून त्यांचे जिव्हाळ्याने स्वागत केले. दुर्गम भागातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासन कटिबद्ध आहे,असा विश्वास यावेळी शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केला.
वाशीमच्या मंगरूळपीर इथ राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील अटी व शर्तींविरोधात शेतकरी आक्रमक होत,शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. निवेदनानंतर संतप्त शेतकऱ्यांनी शासनाच्या कर्जमाफी आदेशाची होळी करून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली...
- भाजपच्या मतदारांना शहराध्यक्ष सुनील केदारांकडून व्हीप जारी
- व्हीप आदेश देतांना महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेही उपस्थित
- पंचतारांकित हॉटेलमध्ये व्हीप बजावण्याचे काम सुरू
- व्हीप बजावल्यानंतर भाजप मतदारांची ठाण्यात सहल जाणार
- शिंदेंच्या शिवसेनेनंतर भाजपचीही सहल रणनीती
नंदुरबारच्या शहाद्यातून शासकीय अधिकारांचा गैरवापर करणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहादा तहसीलदार संभाजी पाटील यांच्या पत्नीने चक्क घरचा किराणा भरण्यासाठी सरकारी वाहनाचा आणि चालकाचा वापर केल्याचे उघड झाले आहे. तहसीलदार कार्यालयात कार्यरत असताना, त्यांच्या पत्नी शहाद्यातील नवजीवन मार्ट समोर सरकारी गाडी MH39AB7580 आणि शासकीय चालकासह आढळून आल्या. आपल्या लहान मुलांसह त्यांनी या गाडीतून किराणा सामानाची वाहतूक केली.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजची सुनावणी पार पडली.
-नवनियुक्त न्यायाधीश जयश्री पुलाटे यांच्या समोर आजची सुनावणी पार पडली.
- आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर वकिलांकडून युक्तिवाद झाला.
गणेश नाईक कुद्र्या मनाचे अल्पसंतुष्ट माणूस, हा माणूस भाजपाचा निष्ठावंत नाही. मनोहर जोशी यांचे सरकार पडण्यासाठी पवारांना सुद्धा मदत केली होती.माजी आमदार शहाजी पाटील यांनी डागली तोफ. ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळल्याने शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे आक्रमक झाले आहेत त्यांनी भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर शेलक्या या शब्दात टीका केली आहे. एक दिवस गणेश नाईक नवी मुंबई राजकारणातून संपलेले दिसतील.
पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनाचे नेतृत्व करणार असून NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांमुळे प्रभावित विद्यार्थी सहभागी होणार.
- आंदोलनात नागपूरमधील विविध सामाजिक संघटनांनाही सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्याचे गेल्या 50 वर्षांपासूनचे प्रलंबित स्वप्न असलेल्या मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून जवळपास एक ते दीड वर्षात धुळेकरांना बाळापुर ते फागणे या मार्गाचा उपभोग प्रत्यक्षात घेता येणार असल्याचे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा माजी खासदार सुभाष भामरे यांनी या मार्गाची प्रत्यक्षात पाहणी करतेवेळी स्पष्ट केले आहे, आज बाळापूर-फागणे परिसरात नव्याने उभारल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानक आणि ट्रॅकच्या कामाची पाहणी आमदार अनुप अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह केली.
स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात आज कल्याणमधील महावितरणच्या तेजश्री कार्यालयात शिवसेना आणि मनसे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. स्मार्ट मीटरची सक्ती नागरिकांवर लादली जात असल्याचा आरोप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात धडक देत जोरदार घोषणाबाजी केली.
विधान परिषद निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असतानाही महायुतीच्या नेत्यांमध्ये रुसवे - फुगवे आहे की काय? अशी परिस्थिती भंडारा - गोंदियात बघायला मिळाली. नामनिर्देशन दाखल प्रक्रियेपासून ते प्रचार सभेत दरम्यान महायुतीच्या घटक पक्षातील शिंदेसेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती आणि याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट दोन दिवसापूर्वी भंडारा गाठत आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सुमारे अर्धा तासांपेक्षा अधिक वेळ त्यांच्याशी चर्चा केली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असून त्यांनी शाहू महाराज यांची भेट घेतली. यावेळी कोल्हापुरात १ लाख ४० हजार नोंदी सापडल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली.
पुणे विमानतळावर प्रवाशांना सोडण्यासाठी येणार्या खासगी चारचाकी वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे विमानतळ प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे.आता विमानतळ टर्मिनलसमोर 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणार्या वाहनांवर 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.पुणे विमानतळ प्रशासनाने या संदर्भातील प्रस्ताव दिल्ली मुख्यालयाला पाठवलाअसून त्याला मंजुरी मिळताच याची अंमलबजावणी सुरू केली.
अक्कलकोट तालुक्यातील बसलेगाव रोड परिसरातील खडीमशीन तलावातील घटना
बनजगोळ येथील सागर बनसोडे हा तरुण पोहण्यासाठी पाणवठ्यावर गेला होता.
खडीमशीनच्या डोहात पाण्याचा अंदाज न आल्याने सागर बुडाल्याचा प्राथमिक माहिती
बचाव पथकाच्या मदतीने तरुणाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
राजमाता जिजाऊ अभिवादन यात्रा जालन्यात दाखल झाली असून जालन्यात ठिकठिकाणी अभिवादन यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी ही यात्रा त्यांच्या जन्मस्थळ सिंदखेडराजा ते स्मृतिस्थळ पाचाड (रायगड) या मार्गावर काढण्यात आली आहे. या यात्रेचे यंदाचे पाचवं वर्ष असून जालन्यात या यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
वसमत विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी शेतीच्या बांधावरून सरकारच्या फसव्या कर्जमाफी वरून दिला इशारा
अटी व शर्ती न ठेवता सरसकट कर्जमाफी द्या आमदार नवघरेंची सरकारकडे मागणी
शासनाला पत्र पाठवले तर अधिवेशनात मागणी लावून धरू आमदार चंद्रकांत नवघरे यांच शेतकऱ्यांना आश्वासन
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे काल झालेल्या अपघात प्रकरणानंतर नवज्योत गडोख राहणार पुणे आणि रस्त्याच्या कामात सहभागी असणारे व देखरेख करणारे सर्व संबंधित इसम यांच्यावर वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा व निष्काळजी पणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजना कडे दुर्लक्ष केले.संरक्षक कडे बसवले नाहीत.रस्त्याच्या बाजूस विहीर असल्याचा दिशादर्शक फलक लावलेला नाही. संबंधित ठिकाणी गती रोधक केलेले नाहीत. प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनच उपाययोजना केलेल्या नाहीत. अशा प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम 105 125 अ, 3(5) प्रमाणे वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
लातूर जिल्ह्यात आज सर्व शाळा सुरू झाल्या आहेत.
शाळेच्या पहिल्याच दिवशी निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा या शाळेतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची बैलगाडीतून अनुक्या पद्धतीने गावात मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले.
शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे केंद्रप्रमुख पांडुरंग मस्के यांनी सांगितले.
या केंद्रांतर्गत असलेल्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे विविध पद्धतीने स्वागत करण्यात आले
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थिती महायुतीची बैठक सुरू..
जागा जिंकण्यासाठी 'फायनल गेम प्लॅन'वर मंथन...
रवी राणा, सुलभा खोडके, घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित.
मनोज जरांगे पाटील खासदार शाहू महाराज यांच्या भेटीला
नवीन राजवाडा इथं मनोज जरांगे पाटील यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची घेतली भेट
मराठा आरक्षणासह राज्यातील विविध मुद्द्यांवर खासदार शाहू महाराज यांच्यासोबत मनोज जरांगे पाटील यांची चर्चा सुरू
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पांझन नदीवर मध्यम प्रकल्प असलेल्या नागा-साक्या धरणाने तळ गाठायला सुरुवात
सध्या धरणात पाण्याचा 15 टक्के पेक्षा कमी पाणी साठा उरला आहे.
एकीकडे धरणातील पाणी साठा संपुष्टात येण्याच्या मार्गांवर असून दुसरीकडे पाऊस देखील लांबल्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या नांदगाव, मालेगावसह 56 खेडी पाणी पुरवठा योजनेवर पाणी टंचाईची टांगती तलवार
पाच महिन्यांनंतर दर्शनासाठी खुले झालेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
मात्र ऑनलाइन पास नसलेल्या भाविकांना रोखण्यात येत असल्याने काही ठिकाणी पोलिस आणि भाविकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव येथे प्लास्टिक स्क्रॅपला रात्री अचानक आग लागली.
आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन जवानांनी तत्परतेने आग आटोक्यात आणत मोठी दुर्घटना टाळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तब्बल पाच महिन्यांनंतर श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.
सजलेल्या महादेवनगरीत भक्तिमय वातावरण असून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
प्रशासनाने दर्शनासाठी शिस्तबद्ध नियोजन केले असून पूर्व-बुकिंग असलेल्या भाविकांनाच प्रवेश दिला जात आहे.
* इंधन दरवाढीचा नाशिक विमानसेवेला फटका
* हैदराबाद आणि गोवा विमानसेवेला १७ जूनपासून ब्रेक
* नाशिक-गोवा आणि नाशिक-हैदराबाद सकाळची विमानसेवा दोन महिन्यांसाठी स्थगित
* दिल्लीच्या विमानसेवेवरही परिणाम, एक सेवा बंद होण्याची शक्यता
* नाफेडच्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ
* ३० जूनपर्यंत १ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट
* मात्र आतापर्यंत केवळ 260 मेट्रिक टन कांद्याची खरेदी
त्नागिरी शहराजवळील मिरजोळे एमआयडीसीमधील काही कंपन्यांनी आपलं दूषित सांडपाणी वहाळात सोडल्याचा प्रकार उघडकीस आला.
हा प्रकार समजताच परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
जांभूळ फाटा परिसर ते करंदीकर वाडी या भागातून जाणाऱ्या नैसर्गिक वहाळात दूषित पाणी सोडल्याने संपूर्ण परिसर काळवंडून गेला आहे.
या पाण्याला केमिकलसारखा वास येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण
सातासमुद्रा पार लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे ऐतिहासिक अनावरण
मॉरिशसमध्ये लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे ऐतिहासिक अनावरण
मॉरिशसचे राष्ट्रपती धर्मबीर गोकूल यांच्या हस्ते पार पडल अनावरण
उन्हाळी सुट्टीनंतर दीड महिन्यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील शाळांमधील घंटा आजपासून वाजणार आहे.
शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात येत आहे.
शाळेच्या प्रवेशद्वारापासून वर्गापर्यंत रेड कार्पेट, गुलाबाची फुले देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
सोलापूर शहरातील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये गणपती बाप्पा आणि सरस्वती मातेचे पूजन करत विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले.
आरोपी विष्णू चाटे चा जामीन अर्ज कोर्टात दाखल, त्यावर सरकारी पक्षाकडून लेखी म्हणणे दिलं जाणार.
आजच्या सुनावणीत विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद होण्याची शक्यता.
तसेच प्रलंबित अर्जांवर देखील आदेश येण्याची शक्यता.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्याच्या आरोपींनी केलेल्या मागणीवर उज्वल निकम म्हणणं मांडण्याची शक्यता.
आपल्यावर एल निनोच संकट घोंगावत असून, शेतकरी पाण्याची प्रतीक्षा करत आहेत. तर दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. वाढलेल्या तापमानामुळे अनेक प्रकल्प,विहिरी, बोअरवेल आणि लहान पाणीस्रोतांची पाणीपातळी कमी झाली आहे. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील 260 गावांमध्ये 255 पाणीटंचाई निवारण उपाययोजना राबविण्यात येत असून 125 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तसेच चार गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर आज भाविकांसाठी खुले करण्यात आले. नव्या रूपात सजलेल्या महादेवनगरीत भोलेनाथाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली.
मंदिर परिसरातील विकासकामे अंतिम टप्प्यात पोहोचल्यानंतर आज सकाळी सात वाजता महाआरती आणि दुग्धाभिषेक पार पडला. त्यानंतर भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर पुन्हा दर्शनासाठी खुले होणार आहे.
मंदिर परिसरातील विकासकामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.
पहिल्या दिवशी भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी
सकाळी सात ते अकरा वाजेपर्यत पास बुकिंग असलेल्या एक हजार भाविकांनाच दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे मात्र त्यापूर्वीच भाविकांनी गर्दी केलीय
यवतमाळ जिल्ह्याला एल-निनोचा इशारा,जलसाठा सांभाळण्याचा सूचना पाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश यवतमाळ जिल्ह्यातील तालुका प्रमुखांना सतर्क राहण्याचे निर्देश, पाणी वाटपचा कृती आराखडा 31 आघात पर्यंत धरणातील पाणी न सोडण्याचे निर्देश
हवामान विभागाने अल निनोचा प्रभाव वाढणार असल्याचा इशारा दिला आहे, यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असून यातूनच यवतमाळ जलसंपदा विभागाने पाणी जपून वापरण्याचा सूचना दिल्या आहेत. धरणातील प्रस्तावित सिंचनाचे पाणी,यासोबतच धरणातील पाणी 31 ऑगस्ट पर्यंत न सोडण्याच्याही सूचना दिल्या आहेत. याशिवाय धरणातून सोडले जाणारे पाणी बंद करण्याचे आदेश काढले आहेत या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.