Best Mileage Bike Under 80000 Saam Tv
बिझनेस

पॉवरफुल इंजिन, 70 Kmpl मायलेज; 80000 हजारांच्या आत येतात 'या' बाईक्स

Best Mileage Bike Under 80000: नोकरदार वर्ग असोत किंवा दैनंदिन घरातील काम करण्यासाठी बाईकची गरज असो, परवडणाऱ्या किमतीत आणि जास्त मायलेज देणाऱ्या या बाईकची बाजारात जास्त विकल्या जातात. अशाच काही बाईक्सबद्दल जाणून घेऊ...

Satish Kengar

बाजारात उपलब्ध असलेल्या 100 ते 150 सीसी इंजिन असलेल्या बाईक्स सर्वाधिक मायलेज देतात. यामुळेच या बाईक्स मध्यमवर्गीय कुटुंबांची पहिली पसंती आहे. नोकरदार वर्ग असोत किंवा दैनंदिन घरातील काम करण्यासाठी बाईकची गरज असो, परवडणाऱ्या किमतीत आणि जास्त मायलेज देणाऱ्या या बाईकची बाजारात जास्त विकल्या जातात. अशाच काही बाईक्सबद्दल जाणून घेऊ...

Hero HF Deluxe

या न्यू जनरेशन बाईकमध्ये 97.2 सीसीचे इंजिन आहे. बाईकमध्ये सहा व्हेरियंट ऑफर केले जात आहेत. हीरो बाईक ऑन रोड किंमत 69273 रुपयांपासून सुरु होते. या 4 स्पीड ट्रान्समिशन बाईकची सीटची उंची 805 मिमी आहे. 65 kmpl चा मायलेज मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. बाईक Combined Braking System आणि ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत.

Bajaj CT110X

या बाईकमध्ये 115.45 cc इंजिन आहे. ही 4 स्पीड ट्रान्समिशन बाईक 69626 रुपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किंमतीत येते. यात पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस ट्विन शॉक ऍब्जॉर्बर सस्पेंशन आहे.

ही बाईक 70 kmpl पर्यंत मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. ही बाईक ताशी 90 किमीचा टॉप स्पीड देते. ही बजाज बाईक 8.6 पीएस पॉवर आणि 9.81 एनएम टॉर्क जनरेट करते. बाईकचे वजन 127 किलोग्रॅम आहे आणि यात 11 लिटरची इंधन टाकी आहे.

Honda SP160

ही बाईक 162.71 cc इंजिनसह येते. जे 13.27 bhp पॉवर आणि 14.58 Nm टॉर्क जनरेट करते. होंडाच्या या बाईकमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. या बाईकमध्ये 12 लिटरची इंधन टाकी आहे. Honda SP160 बाईक 1.17 लाख एक्स-शोरूम किंमतीत ऑफर केली जात आहे. ही बाईक 50 kmpl चा मायलेज देईल, असं कंपनीचं म्हणणं आहे. या बाईकचा टॉप स्पीड 108 kmph आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT