सप्टेंबरमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी
सणानिमित्त बँका राहणार बंद
सणासुदीनिमित्त ९ दिवस बँकांना सुट्टी
गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाले आहे. त्यामुळे ऑगस्टचा शेवटचा आठवडा आणि सप्टेंबरचा पहिला आठवडा हा खूप भक्तिमय असणार आहे. दरम्यान, या काळात सुट्ट्यादेखील असणार आहे. गणेशोत्सवात बँकांना काही दिवस सुट्टी असणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात अनेक सण आहेत. पुढच्या महिन्यात नवरात्री,ओणम, ईद असणार आहे. त्यामुळे बँका बंद असणार आहेत.
सप्टेंबर महिन्यात सणानिमित्त जवळपास ९ दिवस बँका बंद असणार आहे. याचसोबत वीकेंडच्या सुट्ट्या असणार आहे. त्यामुळे जर तुमचे बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी बघून जा.
सध्या बँकेची सर्व कामे ही ऑनलाइन होतात. परंतु काही कामे अशी असतात की ज्यासाठी बँकेत जाणे गरजेचे असते. त्यामुळे ही माहिती खूप महत्त्वाची आहे. दरम्यान, या काळात बँकांची ऑनलाइन सुविधा सुरु असणार आहे.
सप्टेंबरमधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holiday In September)
३ सप्टेंबर- करमा पूजा-रांचीमधील बँका बंद
४ सप्टेंबर (बुधवार)- ओणमनिमिच्च कोच्ची आणि तिरुवनंतपुरममधील बँका बंद
५ सप्टेंबर (गुरुवार)- ईद-ए मिलाद, मिलाद ऊन नबी, गणेश चतुर्थी, इंद्रजात्रा यानिमित्त अहमदाबाद, मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद, चैन्नई येथील बँका बंद राहतील.
६ सप्टेंबर (शुकवार)- इंद्रजात्रा, गंगटोकमध्ये सुट्टी असणार आहे. याचसोबत जम्मू, रायपूर, श्रीनगरमधील बँका बंद असतील.
१२ सप्टेंबर (गुरुवार)- ईद ए मिलादच्या दुसऱ्या दिवशी जयपूर, जम्मू श्रीनगरमध्ये बँका बंद
२२ सप्टेंबर (सोमवार)- नवरात्र स्थापनानिमित्त जयपूरमध्ये बँका बंद
२३ सप्टेंबर (मंगळवार)- महाराजा हरि सिंहजी जन्मदिनानिमित्त जयपूरमध्ये बँकांना सुट्टी
२९ सप्टेंबर (सोमवार)- महासप्तमी, दुर्गा पूजानिमित्त आगरतळा, गुवाहाटी, जयपूर, कोलकत्तामधील बँका बंद
३० सप्टेंबर (मंगळवार)- महाअष्टमी, दुर्गा पूजानिमित्त आगरतळा, रांची, कोलकत्ता, पटना, भुवनेश्वरसह अनेक शहरांमध्ये बँका बंद
वीकेंडला सुट्टी
७ सप्टेंबर, १४ सप्टेंबर, २१ सप्टेंबर, २८ सप्टेंबरला रविवार असल्याने बँका बंद असणार आहेत.१३ सप्टेंबर,२७ सप्टेंबर रोजी दूसरा आणि चौथा शनिवारनिमित्त बँका बंद असणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.