उद्यापासून एप्रिल महिना सुरु होणार आहे. एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. एप्रिल महिन्यात अनेक सण आहेत. त्यामुळे या महिन्यात बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या राज्यातील सणासुदीच्या दिवशी सुट्ट्या असणार आहे. यामध्ये महावीर जयंती, आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे यासारख्या सणांचा समावेश आहे.
जर तुमचे एप्रिल महिन्यात तुमचे बँकेत काही काम असेल तर तुम्ही सुट्ट्यांची यादी पाहून जा. सुट्ट्यांच्या दिवशी तुम्ही बँकेत गेलात तर तुमचे काम होणार आहे. बँका ऑफलाइन पद्धतीने बंद असल्या तरीही तुम्ही काही कामे ऑनलाइन पद्धतीने करु शकतात.
एप्रिल महिन्यात किती दिवस बँका राहणार बंद?
१ एप्रिल- मंगळवार
१ एप्रिलला सर्व राज्यातील बँकांना सुट्ट्या असणार आहे. झारखंडमध्ये सरहुल पर्वनिमित्त सुट्टी असणार आहे.
५ एप्रिल- शनिवार
५ एप्रिलला तेलंगणातील बँका बंद असणार आहे. या दिवशी बाबू जगजीवन राम जयंती आहे.
१० एप्रिल- गुरुवार
गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चित बंगाल, तेलंगणामधील बँका बंद असणार आहे. १० एप्रिलला महावीर जयंती साजरी केली जाणार आहे.
१४ एप्रिल- सोमवार
आंबेडकर जयंतीनिमित्त अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या असणार आहे. मिझोराम, मध्य प्रदेश, चंदीगढ, अरुणाचल प्रदेश, नागालँड, दिल्ली, छत्तीसगड, मेघालय, हिमाचल प्रदेशात बँका बंद असणार आहेत.
१५ एप्रिल- मंगळवार
आसाम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेशात बंगाल न्यू ईअर, हिमाचल डेनिमित्त बँकांना सुट्टी असणार आहे.
१८ एप्रिल- शुक्रवार
त्रिपुरा, आसाम, राजस्थान, जम्मू, हिमाचल प्रदेश आणि श्रीनगरमध्ये गुड फ्रायडेनिमित्त बँका बंद असणार आहे.
२१ एप्रिल- सोमवार
त्रिपुरामध्ये बँक असणार आहेत. या दिवशी गरिया पूजानिमित्त सुट्टी असणार आहे.
२९ एप्रिल- मंगळवार
हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद असणार आहे. या दिवशी भगवान परशुराम जयंती साजरी केली जाते.
३० एप्रिल (बुधवार)
कर्नाटकात बँका बंद असणार आहेत. या दिवशी बसवा जयंती आणि अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे.
याचसोबत दुसरा आणि चौथा शनिवार बँका बंद असणार आहेत. त्याचसोबत रविवारीदेखील बँका बंद असणार आहेत.
कोणत्या सुविधा बंद?
जर बँकांना सुट्टी असली तरीही ऑनलाइन अनेक कामे सुरु असणार आहे. ऑनलाइन बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि यूपीआयचा वापर करु शकतात. यामध्ये तुम्ही रिचार्ज करण्यापासून ते बिल भरण्यापर्यंत अनेक गोष्टी करु शकतात.एटीएममधून पैसे काढण्यासाठीही बँकेत जायची गरज भासणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.