BSNL New Recharge Plan: BSNL ने आणला नवा रिचार्ज प्लान,54 दिवसांपर्यंत दररोज मिळेल 2GB डेटा अन् अनलिमिडेट कॉल

BSNL New Prepaid Recharge Plan: बीएसएनएलने 54 दिवस वैध असणारा नवा स्वस्त प्लान आणलाय. या प्लानमुळे Airtel, Jio आणि VI चं टेन्शन वाढलंय.
BSNL New Prepaid Recharge
BSNL New Prepaid Recharge Plansaam tv
Published On

बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लान लॉन्च केलाय. सरकारी टेलिकॉम कंपनीने लॉन्च केलेल्या या प्लानमध्ये डेटा, एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग सारखे फायदे मिळणार आहेत. भारत संचार निगम लिमिटेडने आपल्या नव्या प्लानमुळे एअरटेल, जिओ, आणि Vodafone Idea सारख्या कंपन्यांना टक्कर मिळणार आहे. स्वस्त रिचार्ज आणून बीएसएनएल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे.

BSNL New Prepaid Recharge
Samsung Galaxy S23: ऐका हो ऐका! स्वस्त झाला 5G आणि 256GB वाला Samsung Galaxy S23 फोन, जाणून घ्या नवी किंमत

BSNL ने अधिकृत X हँडलवर पोस्ट करून आपल्या या नवीन रिचार्ज प्लानची माहिती दिलीय. BSNL च्या नवीन प्लानची किंमत 347 रुपये आहे. यात ग्राहकांना देशभरातील कोणत्याही नेटवर्कच्या युझरला मोफत अमर्यादित कॉल करता येणार आहे. यावर कोणताच शुल्क कंपनी आकारणार नाहीये. ग्राहकांना दिल्ली आणि मुंबईतील एमटीएनएल नेटवर्कवर मोफत कॉलिंग आणि नॅशनल रोमिंगचाही लाभ घेता येणार आहे.

BSNL New Prepaid Recharge
Vivo V50 ची भारतात दमदार एन्ट्री; मजबूत बॅटरी, स्लिम बॉडी, जाणून घ्या विओच्या नवीन फोनचे फीचर्स

या प्रीपेड प्लानसह युझरला 2 GB हाय स्पीड डेटा प्रत्येक दिवशी मिळणार आहे. याशिवाय ग्राहकांना प्रत्येक दिवशी 100 SMS करता येतील. तसेच बीएसएनएलच्या या प्लानची वैधता 54 दिवसांची असणार आहेत. रिचार्ज करणाऱ्या युझर्सला BiTVचा फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. त्याद्वारे ते त्यांच्या मोबाईलवर 450 पेक्षा जास्त लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि OTT ॲप्सचा लाभ घेऊ शकतील.

स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी ट्रायचे प्रयत्न

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) स्पॅम कॉल्स थांबवण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत. TRAI ने टेलीमार्केटिंगसाठी 10 अंकी फोन नंबरवर बंदी घातलीय. सतत स्पॅम कॉल करणाऱ्या कंपन्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचा मोठा दंड ठोठावण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. ट्रायने एक नवीन ॲप डू-नॉट-डिस्टर्ब (DND) देखील सादर केले आहे, याच्या मदतीने युझर्स स्पॅम कॉल्स पूर्वीपेक्षा चांगले व्यवस्थापित करू शकतील.

BSNL ची 336 दिवसांच्या ऑफर

बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी एक उत्तम प्लान सादर केलाय. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनमुळे कोट्यवधी वापरकर्त्यांना महागड्या रिचार्ज प्लॅनमधून मोठा दिलासा मिळेल. बीएसएनएलने सुमारे 11 महिने म्हणजेच 336 दिवसांची दीर्घ वैधता दिली जात आहे. सरकारी कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत फक्त 1499 रुपये आहे.

जर तुम्ही बीएसएनएल सीम वापरत असाल आणि कमी किमतीत पूर्ण वर्षाचा रिचार्ज प्लॅन हवा असेल तर हा सर्वोत्तम पर्याय आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 24 जीबी डेटा दिला जात आहे. दरमहा सुमारे 2 जीबी डेटा वापरू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com