Samsung Galaxy S23: ऐका हो ऐका! स्वस्त झाला 5G आणि 256GB वाला Samsung Galaxy S23 फोन, जाणून घ्या नवी किंमत

Samsung Galaxy S23 256GB : किंमतीत मोठी घसरण झालीय. त्यामुळे जर तुम्ही नवा फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
 Samsung Galaxy
Samsung Galaxy S23 256GB saam Tv
Published On

साउथ कोरियाची स्मार्टफोन सॅमसंग फोन कंपनीने ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिलीय. आपल्या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. त्यामळे ज्या लोकांना प्लॅगशिप स्मार्टफोन घेऊ शकत नव्हते ते आता मोबाईल घेऊ शकणार आहेत. जर तुम्ही फक्त बजेटमुळे सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करू शकत नसाल तर आता तुमचे टेन्शन कंपनीच्या या निर्णयामुळे संपणार आहे. Samsung Galaxy S23 5G च्या किंमतीत लक्षणीय घट झालीय.

हा प्रीमियम स्मार्टफोन तुम्ही आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करू शकता. Samsung Galaxy S23 5G ची किंमत 44 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे तुम्हाला स्वस्तात फोन खरेदी करण्याची संधी आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगनचा पॉवरफुल प्रोसेसर आणि मागील पॅनलमध्ये उत्कृष्ट ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. ज्या युझर्सला सर्वात्तम कॅमेरा हवा आहे, त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन सर्वोत्तम पर्याय आहे.

जे युझर्स ई-कॉमर्स वेबसाइटवरून हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे. कारण या फोनची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे, परंतु Amazon यावर या फोनच्या किमतीत सर्वात मोठी सूट देण्यात येणार आहे. फ्लॅट डिस्काउंटसह, तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरमध्ये अतिरिक्त बचत देखील करू शकणार आहात.

Samsung Galaxy S23 5G च्या किमतीत घसरण

Samsung Galaxy S23 5G 256GB सध्या Amazon वर 95,999 रुपये या फोनची किमती आहे. पण कंपनी या प्रीमियम क्लास फोनवर ग्राहकांना 46% ची भरघोस सूट देण्यात आलीय. या ऑफरद्वारे हा फोन फक्त 52,079 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. म्हणजे तुमचे थेट ४४ हजार रुपये वाचणार आहेत. ॲमेझॉनच्या बँक आणि एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही प्रचंड पैसे वाचवू शकता.

 Samsung Galaxy
BSNL Recharge New Plan 2025: BSNL च्या 336 दिवसांच्या ऑफरने घातला धुमाकूळ; अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळणार का डेटा फ्री? वाचा संपुर्ण माहिती

कंपनीने निवडक बँक कार्डांवरही ग्राहकांना थेट 2000 रुपयांची सूट दिलीय. Amazon Pay बॅलन्सद्वारे 1,562 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. जर तुमचे बजेट कमी असेल तर कंपनी EMI ऑप्शन देखील देत आहे. तुम्ही हा फोन फक्त Rs 2,345 च्या EMI वर खरेदी करू शकता आणि तो घरी नेऊ शकता.

 Samsung Galaxy
Credit Card CVV: क्रेडिट कार्डवरील CVV नंबर काय असतो? 'या' नंबरमुळेच कसा सुरक्षित राहतो तुमचा पैसा?

30 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा फोन

Samsung Galaxy S23 5G 256GB देखील 30 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. यावर फ्लॅट डिस्काउंटसोबतच Amazon ग्राहकांना 22,800 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही देत ​​आहे. जर तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन देऊन पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळत असेल तर तुम्ही हा फोन फक्त 29,200 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुमचा जुना फोन चांगला कार्यरत आणि त्याची स्थिती चांगली असणं आवश्यक आहे.

Samsung Galaxy S23 5G चे फिचर्स

Samsung Galaxy S23 5G मध्ये अॅल्युमिनियम फ्रेम देण्यात आलीय. हा स्मार्टफोन IP68 च्या रेटिंगसह येतो.

यामध्ये तुम्हाला 6.1 इंच डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले मिळेल ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्लेची ब्राइटनेस 1750 nits पर्यंत आहे.

आउट ऑफ द बॉक्स स्मार्टफोन Android 13 वर चालतो जो तुम्ही अपग्रेड करू शकता.

परफॉर्मन्ससाठी स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आलाय.

Samsung Galaxy S23 5G मध्ये 8GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेज करता येणार आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50+10+12 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर देण्यात आलाय. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय.

स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी यात 3900mAh बॅटरी देण्यात आलीय. ही बॅटरी 25W ने फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com