
सायबर फ्रॉडबाबत सतर्क राहण्यासाठी बँकेडून मेसेज पाठवले जातात. आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी बँकेचे कर्मचारी क्रेडिट कार्डसंबंधित माहिती कोणाला देऊ नका. कार्डवरील सीव्हीव्ही नंबर आणि ओटीपी कोणाशी शेअर करू नका, असे संदेश आपल्या ग्राहकांना देत असतात. पण वाचक मित्रांनो, तुम्हाला CVVनंबर काय असतो, हे माहिती आहे का? नाही, ना काळजी नको, आपण याचीच माहिती जाणून घेणार आहोत. तसेच या नंबरमुळे आपले पैसे कसे सुरक्षित राहतात, हेदेखील जाणून घेऊ.
तुमच्या क्रेडिट कार्डवर ३ किंवा ४ अंकी सुरक्षा क्रमांक छापलेला असतो. या नंबरला CVV (कार्ड पडताळणी मूल्य) म्हणतात. हा नंबर बहुतेकवेळा स्वाक्षरी असलेल्या ठिकाणी असतो. व्हीजा, रुपे, मास्टरकार्ड, डिस्कच्या कार्डवर हा तीन अंकी सीव्हीव्ही नंबर पाहायला मिळतो. दरम्यान अनेक इंटरनॅशनल क्रेडिट कार्ड्सवर ४ अंकांचा नंबर असतो. हा नंबर कार्डाच्या वरच्या बाजूवर असतो. हा क्रमांक अनधिकृत पेमेंट्स प्रतिबंधित करत असतो आणि फसवणुकीुपासून तुमचं संरक्षण करत असतो.
अनेक ग्राहक सिस्टममध्ये कार्ड नंबर आणि एक्सपायरी डेट सेव्ह करून ठेवतात. परंतु सीव्हीव्ही नंबर मर्चंटच्या डेटाबेसमुळे सुरक्षित राहते. एखाद्या व्यापाऱ्याची सिस्टीम हॅक झाली तरीही तुमचा डेटा काही प्रमाणात सुरक्षित राहतो. ऑफलाइन व्यवहारांमध्ये तुम्हाला पेमेंट करण्यासाठी तुमचा पिन टाकावा लागेल. तर ऑनलाइन द्वारे पैशांचे व्यवहार करताना तुम्हाला सीव्हीव्ही नंबर टाकावा लागतो, नंतर तुमच्या नोंदणी करण्यात आलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जातो. त्यामुळे फ्रॉडपासून आपला बचाव होत असतो.
CVV/ CVC (Pupay/ Visa/ Mastercard) या कार्डच्या मागे तीन अंकी नंबर असतो.
CID ( American Express) या कार्डच्या पाठीमागे ४ अंकी क्रमांक असतो.
बँक सिस्टम्स तु्म्हाला एक युनिक डेटातून सीव्हीव्ही नंबर जनरेट करत असते. सिस्टम कार्डच्या प्रायमरी अकाउंट नंबर ( पॅन), एक्सपायरी डेट, सर्व्हिस कोड, आणि डेटा एन्क्रिप्शन स्टॅडर्ड वापरत असते. सुरक्षेच्या दृष्टीने या प्रक्रियेचा उपयोग करण्यात आलेल्या सटीक एल्गोरिदमचा खुलासा केला जात नाही. या पद्धतीने CVV क्रमांक युनिक बनवते आणि ऑनलाइन पेमेंट करताना तुमच्या कार्डची सुरक्षा वाढवत असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.