BSNL Recharge New Plan 2025: BSNL च्या 336 दिवसांच्या ऑफरने घातला धुमाकूळ; अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळणार का डेटा फ्री? वाचा संपुर्ण माहिती

BSNL Recharge 2025: तुम्ही BSNL चे सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतेच बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी एक उत्तम प्लान सादर केला आहे.
BSNL Recharge 202
BSNL Recharge New Plan 2025ai
Published On

तुम्ही BSNL चे सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतेच बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी एक उत्तम प्लान सादर केला आहे. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनमुळे कोट्यवधी वापरकर्त्यांना महागड्या रिचार्ज प्लॅनमधून मोठा दिलासा मिळाला आहे. जर तुम्हाला मासिक प्लॅन पुन्हा पुन्हा घेऊन कंटाळा आला असेल तर तुम्हाला हा प्लॅन खूप आवडेल.

जगातल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे सीम कार्ड असते. त्यातल्या काही व्यक्तींकडे दोन सीम कार्ड सुद्धा असतात. त्या दोन्हींचा वापर ते एकाच वेळी करत असतात. त्यात आता रिचार्जच्या किमती सुद्धा वाढले आहेत. त्यातच बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी रिचार्ज प्लान केले आहेत. भारत संचार निगम लिमिटेड त्यांच्या ग्राहकांना विविध स्वस्त रिचार्ज योजना ऑफर करते.

BSNL Recharge 202
Cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे बंद झालेल्या नसा क्षणार्धात होतील साफ, फक्त सकाळी उठून प्या 'हा' ज्युस

कंपनी आपल्या परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनसह जिओ, एअरटेल आणि VI ला कडक स्पर्धा देत आहे. स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या बळावर, बीएसएनएलने काही महिन्यांत लाखो नवीन ग्राहक जोडले आहेत. एवढेच नाही तर, बीएसएनएलकडे खाजगी कंपन्यांपेक्षा जास्त वैधता असलेल्या योजनांचे पर्याय आहेत.

बीएसएनएलच्या स्वस्त योजना आणि त्याचा ग्राहकांना फायदा काय?

बीएसएनएलने आता असा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे ज्यात ग्राहकांना सर्वात कमी किमतीत सुमारे ११ महिने म्हणजेच ३३६ दिवसांची दीर्घ वैधता दिली जात आहे. सरकारी कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत फक्त १४९९ रुपये आहे. जर तुम्ही बीएसएनएल सिम वापरत असाल आणि कमी किमतीत पूर्ण वर्षाचा रिचार्ज प्लॅन हवा असेल तर हा सर्वोत्तम पर्याय आहे.

प्लानच्या संपुर्ण सेवा

सरकारी टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांना या १४९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये सर्व स्थानिक आणि एसटीडी नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंग देते. संपूर्ण ११ महिन्यांत तुम्ही जितके मोकळेपणाने बोलू शकता तितके बोलू शकता. कंपनी यामध्ये डेटा देखील देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण २४ जीबी डेटा दिला जात आहे. म्हणजे तुम्ही दरमहा सुमारे २ जीबी डेटा वापरू शकता. डेटा ऑफरवरून असे दिसून येते की हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना फक्त कॉलिंगची आवश्यकता आहे. यामध्ये तुम्हाला दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतात.

BSNL Recharge 202
Exam Preparation: संपूर्ण अभ्यासक्रम लक्षात ठेवण्यासाठी वेळच उरला नाही! कमी वेळेत परिक्षेची तयारी करणार कशी? हा करियर मंत्र येईल कामी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com