
रिलायन्स जिओचे कार्ड वापरणाऱ्या युजर्ससाठी महत्वाची बातमी आहे. रिलायन्स जिओने रिचार्ज प्लानमध्ये मोठे बदल केले आहेत. रिलायन्स जिओने त्यांच्या सर्वात स्वस्त डेटा व्हाउचरच्या (१९ रुपये आणि २९ रुपये) व्हॅलिडिटीमध्ये मोठा बदल केला आहे. बरेच जिओ युजर्स कमी कालावधीसाठी डेटा वापरण्यासाठी या व्हाउचरवर अवलंबून असतात.
यापूर्वी १९ रुपयांचे व्हाउचर १५ रुपयांना उपलब्ध होते आणि २९ रुपयांचे व्हाउचर २५ रुपयांना उपलब्ध होते. मात्र काही महिन्यांपूर्वी या व्हाउचरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे जिओला प्रति ग्राहक सरासरी महसूल वाढविण्यात मदत होईल.
रिलायन्स जिओने १९ रुपयांच्या डेटा व्हाउचरची व्हॅलिडिटी बदलली आहे. व्हाउचरची व्हॅलिडिटी तुमच्या मुख्य प्लानच्या व्हॅलिडिटीइतकी होती. जर तुमच्या मुख्य प्लॅनची व्हॅलिडिटी ७० दिवस असेल, तर १९ रुपयांचे व्हाउचर देखील ७० दिवसांसाठी वैध असेल. पण आता या व्हाउचरची वैधता फक्त १ दिवसाची झाली आहे.
२९ रुपयांच्या डेटा व्हाउचरबाबतही असेच घडले आहे. यापूर्वी या व्हाउचरची व्हॅलिडिटी देखील तुमच्या मुख्य योजनेच्या व्हॅलिडिटी इतकीच होती. पण आता 29 रुपयांच्या व्हाउचरची व्हॅलिडिटी 2 दिवसांची झाली आहे.
Jio ने या व्हाउचरची व्हॅलिडिटी बदलून आपली कमाई वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. ग्राहक पूर्वीप्रमाणेच रक्कम भरत असले आणि तेवढाच डेटा मिळत असला, तरी आता या व्हाउचरची व्हॅलिडिटी कमी झाली आहे. याचा अर्थ असा की जर ग्राहकांनी आधीचा सर्व डेटा वापरला नाही, तर त्यांना पुन्हा रिचार्ज करावे लागेल, जरी त्यांच्या मुख्य प्लानची वैधता शिल्लक असली तरीही. जिओच्या या निर्णयामुळे युजर्स नाराज झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.