
Vivo ने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केलाय. Vivo V50 हा कंपनीचा नवीन मिड-रेंज फोन आहे. नवीन Vivo V50 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चिपसेट देण्यात आले आहे. या नव्या फोनमध्ये 24 GB पर्यंत रॅम सपोर्ट, अल्ट्रा लार्ज व्हीसी स्मार्ट कूलिंग सिस्टीम सारखे फीचर्स देण्यात आलेत. 90W फ्लॅशचार्ज तंत्रज्ञान आणि 6000mAh बॅटरीसह येणारा हा सर्वात स्लिम हँडसेट असल्याचा दावा विवो कंपनीकडून करण्यात आलाय. नवीन Vivo V50 ची किंमत आणि फीचर्स काय आहेत, हे जाणून घेऊ.
नवीन Vivo V50 स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 34,999 रुपये ठेवण्यात आलीय. तर 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 36,999 रुपये आहे. यासह 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 40,999 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आलाय. या फोनची प्री बुकिंग आजपासून सुरू झालीय. ऑनलाइन ऑफर्स अंतर्गत जर कोणी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी केला तर किंमतीत 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. यासह नो-कॉस्ट ईएमआयची ऑफरी देण्यात आलीय.
Vivo च्या या नवीनतम स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चिपसेट देण्यात आलीय. हे मजबूत कार्य करण्यास मदत करते. Vivo च्या या फोनमध्ये 12 GB इनबिल्ट रॅम देण्यात आलीय. डिव्हाइसमध्ये 12 जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देखील असणार आहे. ग्राहक या फोनमध्ये एकूण 24 जीबी रॅम वापरू शकतात.
Vivo V50 स्मार्टफोनमध्ये 41-डिग्री कर्वेचरसह 6.77 इंच क्वाड-वक्र AMOLE (2392×1080 पिक्सेल) डिस्प्ले देण्यात आलाय. फोनमध्ये 0.186 सेमी पातळ बेझल आहेत. हँडसेटमध्ये संरक्षणासाठी डायमंड शील्ड काच देण्यात आलीय. स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट आणि 450 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते.
Vivo V50 स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर Vivo V40 मध्ये देखील वापरण्यात आला होता. या Vivo हँडसेटमध्ये OIS, Aura Light आणि 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरासह 50MP प्राथमिक रिअर कॅमेरा आहे. हा फोन 50MP फ्रंट कॅमेरासह उपलब्ध करून देण्यात आलाय. Vivo V50 हा सर्वात स्लिम फोन आहे, जो 6000mAh बॅटरीसह येतो. हँडसेटमध्ये 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.