Bank Holiday on Krishna Janmashtami Saam Tv
बिझनेस

Bank Holiday: कृष्ण जन्माष्टमीला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट्स...

Bank Holiday on Krishna Janmashtami: कृष्ण जन्माष्टमी अनेक राज्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी काही राज्यातील बँकांना सुट्टी असते. तुमच्या राज्यातील बँकांना उद्या सुट्टी असणार की नाही हे घ्या जाणून...

Priya More
  • कृष्ण जन्माष्टमीला काही राज्यातील बँका बंद राहणार आहेत

  • जन्माष्टमीला महाराष्ट्रात बँका सुरू राहणार

  • कृष्ण जन्माष्टमीची राज्यनिहाय बँकांना सुट्टी आहे

  • आरबीआयच्या कॅलेंडरनुसार काही राज्यातील बँकांना जन्माष्टमीला सुट्टी आहे

संपूर्ण देशभरामध्ये कृष्ण जन्माष्टमी ४ जानेवारीला म्हणजे शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. कृष्ण जन्माष्टमीला अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असते. पण जन्माष्टमीला संपूर्ण देशात बँका बंद राहत नाहीत. अनेक राज्यातील बँका सुरू असतात. जर तुम्ही उद्या बँकांमध्ये जाऊन काम करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बँका सुरू आहेत की नाही हे माहिती असणे गरजेचे आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कॅलेंडरनुसार, शुक्रवारी बहुतेक राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. उद्या दिल्लीतील बँका सुरू राहतील. पण उत्तर प्रदेशमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी बँका बंद राहणार आहेत. कोण-कोणत्या राज्यामध्ये बँका सुरू असणार आणि कोणत्या राज्यात बँकांना सुट्टी असणार हे आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्ही बँकेमध्ये जाण्याचा प्लान आखू शकाल. नाही तर तुमचा उगाच बँकेत जाण्यासाठीचा वेळ वायाला जाईल.

या राज्यात बँका राहणार बंद -

गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, तामिळनाडू, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, केरळ, कोलकाता, बिहार आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये उद्या बँका बंद राहणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि बंधन बँक यासह सर्व सार्वजनिक बँका आणि खासगी बँका उद्या बंद राहणार आहेत.

या राज्यात बँका राहणार सुरू -

कृष्ण जन्माष्टमिच्या दिवशी देशभरातील अनेक राज्यातील बँका सुरू राहणार आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, दिल्ली आणि गोवा या सर्व ठिकाणी बँका सुरू राहणार आहेत. त्यामुळे या राज्यातील नागरिकांना उद्या बँकांची काम करता येणार आहेत.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यामध्ये १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. आताच तुम्ही बँकांच्या सुट्ट्या पाहून बँकेत जाण्याचे नियोजन तम्ही करू शकता. सप्टेंबरमध्ये १४,६, ११, १२, १३,१४,१५, २०, २१, २२, २३, २५,२६,२७ या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँकांना सुट्टी असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या दोन लेकींची मोठी झेप! क्रिकेट संघात मिळाली संधी

Upvasachi Lassi Recipe : नवरात्री स्पेशल! अवघ्या ५ मिनिटांत बनवा थंडगार मलाईदार लस्सी

Maharashtra News Live Update: रूक्मिणी मातेस पारंपारिक वनदेवी मातेचा पोषाख परिधान

आता सुटे मसाले विकता येणार नाहीत? तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं!

Pune : मोठी बातमी! रॅपिडो बाइक - टॅक्सी सेवा बंद करण्याचे आदेश; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT