भारतीय रिझर्व बँकेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरबीआयने देशातील १० बँकांना जवळपास ६० लाखांचा दंड ठोठावला आहे. नियामकीय मार्गदर्शन सूचनांचे पालन आणि ग्राहकांच्या खात्यांची सुरक्षितता न केल्याचा ठपका ठेवत हा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेशातील बँकांचा समावेश आहे.
आरबीआयने २६ आणि २७ मार्च रोजी या बँकांना नोटीस पाठवली होती. यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आरबीआयने कोणत्या १० बँकांना दंड ठोठावला आहे ते जाणून घेऊया.
आरबीआयने सोलापूर जनता सहकारी बँकेला 28.30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
जनलक्ष्मी सहकारी बँक, नाशिक : RBI ने जनलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेला 59.90 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे.
RBI ने स्टँडर्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला औरंगाबाद (महाराष्ट्र) ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमांनुसार निधीच हस्तांतरण केल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
निधीशी संबंधित तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई स्थित उत्कृष्ट सहकारी बँक लिमिटेडला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आरबीआयने हावडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (पश्चिम बंगाल) १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आरबीआयने राजपालयम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेडला (तामिळनाडू) ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेने मंडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, हिमाचल प्रदेश चिक्कमगलुरु जिल्हा सहकारी सेंट्रल बँक लिमिटेड, चिक्कमगलुरू, कर्नाटक दिंडीगुल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, दिंडीगुल, मथुरा जिल्हा सहकारी बँक, उत्तर प्रदेश या बँकांवर देखील दंडात्मक कारवाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.