Manasvi Choudhary
हिंदू धर्मात, श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. श्रावण महिन्यात अष्टमीला कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो.
धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला, रोहिणी नक्षत्रावर मथुरेत रात्री १२ वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला होता तेव्हापासून हा दिवस श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो.
श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा हा सण शुक्रवार म्हणजे 4 सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे.
भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता. म्हणून जन्माष्टमीच्या पुजेसाठी १२ वाजण्याची वेळ शुभ मानली जाते.
यावर्षी, श्री कृष्ण जन्माष्टमी यंदा 4 सप्टेंबर रोजी रात्री 11:57 वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री 12:43 वाजता समाप्ती होईल.
जन्माष्टमीचा उपवास तुम्ही 4 सप्टेंबरला करा आणि 5 सप्टेंबर रोजी सकाळी 6.01 नंतर सोडा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.