ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात संध्याकाळच्या सुमारास अचानक पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत पालिका प्रशासनाला माहिती दिली आहे.
एकीकडे दुष्काळसदृश परिस्थिती आणि दुसरीकडे ऑक्टोबर हिटमुळे वाढलेला उकाडा, अशा परिस्थितीत पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. आता या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी पालिका प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
पुण्यातील वाघोली परिसरात दुकानाचा पत्रा उचकटून चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
वाघोली परिसरात दुकानाचा पत्रा उचकटून चोरी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी चोरी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे वाघोली परिसरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांना यश मिळाले आहे. परिसरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून, नागरिकांनीही आपल्या दुकानांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
पुण्यात महर्षी पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार.
तर पुणे शिक्षक पदवीधर निवडणुकी संदर्भात देखील स्थानिक नेत्यांशी चर्चा होण्याची शक्यता.
माथेरानचा दिवाळी पर्यटन हंगाम सुरू व्हायला आता काही दिवस बाकी असताना शुभ वार्ता आली असून माथेरानची राणी मिनी ट्रेन आता 20 ऑक्टोबर पासून पर्यटकांच्या दिमतीला हजर होणार असल्याने पर्यटकांबरोबर माथेरानकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.नेमकी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ही मिनी ट्रेन नेरळ ते माथेरान अशा दोन फेऱ्या मारणार आहे.
नेरळ ते माथेरान आणि माथेरान ते नेरळ अशा दोन फेऱ्या अप आणि डाऊनला असणार आहेत. कसं असेल वेळापत्रक पाहू या ग्राफिक्सच्या माध्यमातून
नेरळ ते माथेरान
नेरळ(सुटणार). माथेरान(पोहचणार)
सकाळी 8.50 वाजता. सकाळी 11.30 वाजता
सकाळी 10.30वाजता. दुपारी 01.05 वाजता
माथेरान ते नेरळ
माथेरान (सुटणार). नेरळ (पोहचणार)
दुपारी 2.45 वाजता. संध्याकाळी 5.30 वाजता
संध्याकाळी 0.4.00 वाजता. संध्या.6.40 वाजता
मिनी ट्रेन ट्रॅकवर येणार असल्याने कदाचित अमन लॉज ते माथेरान अशी नियमित धावणाऱ्या शटल सेवेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वीकेंडला शनिवार रविवारी पर्यटकांची गर्दी पाहता ज्यादा विशेष फेऱ्या चालवण्याचा मध्य रेल्वेचा मानस आहे.
ललित पंचमी आणि नवरात्रीच्या पाचव्या दिवसाच्या निमित्ताने रुक्मिणी मातेला वनदेवी मातेचा पारंपारिक पोशाख परिधान करण्यात आला आहे.
यामध्ये हराळी तुळशीच्या पानाफुलांचा समावेश करण्यात आला आहे तसेच रुक्मिणी मातेच्या या पोशाखामध्ये विविध पक्षी प्राण्यांचाही आरास केली आहे.
ब्लड डोनेशन संदर्भात एफ डी ए आयुक्त यांची महत्वाची माहिती
- ब्लड डोनेशन सामाजिक संस्था करू शकत नाहीत. ब्लड बँक या कॅम्पचं आयोजन करू शकतात आणि सामाजिक संस्था त्यांच्यासह काम करू शकतात
- टायटन घड्याळ गिफ्ट प्रकरणात 3 ब्लड बँकवर कारवाई झाली आहे
मुंबईतील आझाद मैदानावर सीजेपीला तिरंगा रॅली काढण्याची परवानगी
मुंबई पोलिसांकडून एका दिवसासाठी रॅलीला परवानगी
पोलिसांकडून तोंडी परवानगी दिल्याची माहिती…
आझाद मैदान हे आंदोलनांसाठी निश्चित केलेले ठिकाण असल्याने रॅलीला परवानगी दिल्याची माहित
नवी मुंबईच्या पामबीच मार्गावर तीन गाड्यांचा भीषण अपघात
वाशी वरून बेलापूरच्या दिशेने भरधाव गाड्यांचा अपघात
मोराज सर्कल जवळ तीन गाड्या एकमेकांना ठोकल्या
अपघातात जीवित हानी नाही मात्र गाड्यांचे मोठे नुकसान
- MPSC प्रकरणाच्या चौकशी आयोगात माझा सहभाग असल्याबाबत कोणतीही माहिती माझ्याकडे नाही
- शाब्दिक चर्चा झालेली आहे
- मात्र अधिकृतरित्या मला काहीही सांगितलेलं नाही
- तुकाराम मुंढे यांची महत्वाची माहिती
- अन्न व औषध प्रशासनाची सप्टेंबर २०२६ अखेरची राज्यव्यापी कारवाई; तुकाराम मुंढे यांची माहिती.
- राज्यभरातील १९,७१३ अन्न आस्थापनांची तपासणी.
- नियमभंगप्रकरणी ८९२ परवाने निलंबित; १,५३८ आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा.
उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या राजकीय व कायदेशीर संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला आव्हान देणारी शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम आणि सभागृह नेते अरुण आशान यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
तसेच, या प्रकरणी महापौरांना पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा चार आठवड्यांत निपटारा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
नालासोपाऱ्यातील कथित सेक्स रॅकेट आणि तरुणींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत (SIT) करण्यात येणार असल्याची घोषणा मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी केली आहे. नालासोपाऱ्यातील हनुमान नगर येथे राहणाऱ्या २२ वर्षीय आरिफ कुरेशी याने डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणींशी मैत्री करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आणि त्यांच्या अश्लील चित्रफिती तयार केल्याचा आरोप आहे. या चित्रफिती परदेशात विकल्याचेही तपासात समोर आल्याची माहिती आहे.
या प्रकरणात आतापर्यंत चार तरुणींनी तक्रारी दिल्या असून, त्यापैकी एक पीडिता अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी संबंधित पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्यात येणार असून, पोलीस उपायुक्त या विशेष तपास पथकाचे प्रमुख असतील, असे कौशिक यांनी सांगितले. या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातातील मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रहिवासी असून, सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण अपघातामुळे एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातातील मृतांचा नेमका आकडा आणि घटनेचा सविस्तर तपशील अधिकृतरीत्या स्पष्ट होणे बाकी आहे.
करुणा मुंढे शर्मा यांनी आज दुपारी वांद्रे येथील अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) मुख्यालयात आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. यावेळी नकली दारू, ड्रग्स तसेच नशेसाठी वापरली जाणारी इंजेक्शन्स आणि गोळ्या यांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली.
नकली दारू आणि अमली पदार्थांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर संबंधित पदार्थांवर कठोर निर्बंध घालावेत, अशी मागणी या भेटीदरम्यान करण्यात आली.
राज्यासह नाशिक जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असून, अनेक भागांत पाणीटंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला दहिवाळ गावाजवळ गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. कालपासून ही गळती सुरू असून, पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या व्हॉल्व्हजवळून पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे.
एकीकडे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गळती सुरू होऊनही मालेगाव महानगरपालिकेकडून अद्याप दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाण्याची नासाडी रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने गळती दुरुस्त करावी, अशी मागणी केली जात आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील सांगवी येथील शेतशिवारात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतातील पिकांची पाहणी करत शेतीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यादरम्यान काँग्रेसचे पदाधिकारीही उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणींची माहिती घेत सपकाळ यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. दुष्काळाच्या संकटात काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
गडचिरोली जिल्ह्यातील १४ गावांमधील जमिनी MIDC साठी देण्याच्या प्रक्रियेला विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱ्यांनी चामोर्शी-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. नागरिकांनी घेतलेल्या आक्षेपांवर सुनावणी घेण्यासाठी केवळ दोन गावांतील नागरिकांना नोटिसा मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या प्रक्रियेबाबत सर्व संबंधित गावांतील नागरिकांना न्याय मिळावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.
मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्याशिवाय जमीन अधिग्रहणासंदर्भातील कोणतीही प्रक्रिया पुढे जाऊ देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. भर उन्हात शेकडो महिला आणि पुरुषांनी चामोर्शीतील राष्ट्रीय महामार्गावर ठाण मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) संबंधित परीक्षा घेतल्याच्या दाव्यावरून सुरू झालेल्या चर्चेदरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केले होते. या आरोपांवर एमपीएससी प्रशासनाने लेखी खुलासा केला आहे. संबंधित परीक्षा २९ आणि ३० जुलै रोजी घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाची सरकारी कंपनी असलेल्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे (MIL) कार्यकारी संचालक अनिल कुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) लाचखोरी आणि संरक्षण उत्पादनाशी संबंधित संवेदनशील माहिती अनधिकृतपणे उघड केल्याच्या आरोपांवरून अटक केली आहे. या प्रकरणात खासगी कंपनी एसएमपीपी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक आशीष कंसल तसेच अनिल कुमार यांचे भाऊ बी. हर्षवर्धन यांनाही अटक करण्यात आली आहे. सुमारे ५०० कोटी रुपयांच्या दारूगोळा पुरवठा कराराशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली.
सरकारी कंपनीतील अधिकृत कामकाज, पुरवठा करार आणि संबंधित निर्णयप्रक्रियेदरम्यान खासगी कंत्राटदारांना अनुचित लाभ मिळवून देण्यात आला होता का, याचा तपास CBI करत आहे. या प्रक्रियेत आर्थिक मोबदल्याची मागणी करण्यात आली होती का आणि कथित आर्थिक व्यवहारांचा दारूगोळा पुरवठा कराराशी काय संबंध होता, याचीही चौकशी सुरू आहे. संरक्षण उत्पादनाशी संबंधित संवेदनशील माहिती अनधिकृतपणे उघड करण्यात आल्याच्या आरोपांचीही तपास यंत्रणेकडून पडताळणी केली जात आहे.
म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनिल कुमार यांच्याशी संबंधित कथित लाचखोरी आणि संरक्षण उत्पादनाशी निगडित संवेदनशील माहिती अनधिकृतपणे उघड केल्याच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) त्यांच्या नातेवाइकांचीही चौकशी करण्यात येणार आहे. कथित गैरव्यवहारातून मिळालेला पैसा लपविण्यासाठी अनिल कुमार यांनी पत्नी, भाऊ आणि इतर नातेवाइकांच्या माध्यमातून रक्कम वळविल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान कथित गैरव्यवहारातील रक्कम लपविण्यास आणि स्वतःकडे ठेवण्यास अनिल कुमार यांच्या पत्नी व भावाने मदत केल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित बँक खात्यांमधील आर्थिक व्यवहार, पैशांचा स्रोत आणि या रकमेचा नेमका वापर कशासाठी करण्यात आला, याची CBI कडून पडताळणी केली जाणार आहे. या चौकशीतून कथित आर्थिक व्यवहारांमधील संबंध स्पष्ट करण्याचा तपास यंत्रणेचा प्रयत्न असेल.
अभिजीत दिपके, कपिल सिब्बल, प्रकाश राज, प्रशांत भूषण आणि नेहा बोरा यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत गुरुवारी गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले. ज्ञानेश कुमार यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी स्वतःच्याच नागरिकांविरोधात युद्ध छेडल्याचा आरोप दिपके यांनी केला.
भारतीय निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेअंतर्गत देशातील १३ कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून हटवल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, SIR प्रक्रियेत मृत घोषित करण्यात आलेल्या काही व्यक्तींना आपण प्रत्यक्ष भेटल्याचेही दिपके यांनी सांगितले. या आरोपांमुळे मतदार यादीच्या पुनरीक्षण प्रक्रियेवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात २० टक्के पाणी कपात करण्यात येणार असून, पाण्याचे नियोजन आतापासूनच सुरू करण्यात आले आहे. खडकवासला धरणात सध्या ८२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पाणी वितरण आणि सिंचनाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व संबंधित विभागांना आदेश देण्यात आले आहेत. पाणी सोडल्यानंतर संबंधित भागातील वीजपुरवठा बंद केला जाणार आहे. उन्हाळी आवर्तन देता येणार नसल्याचे सांगण्यात आले असून, रब्बी हंगामासाठी आवर्तन दिले जाणार आहे.
ज्ञानेश कुमार मोदींना नक्की काय देतायत - दिपके
अभिजीत दिपके नेहा बोरांची पत्रकार परिषद
सीजीपीचे उद्या दिल्लीत 'लेहरा दो तिरंगा' आंदोलन
पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांच्या वैभववाडीतील हेत या गावी त्यांच्या स्मारकाचे भूमीपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कविवर्य सुर्वे यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी नारायण सुर्वे यांच्या एका प्रसिद्ध कवितेचे आपल्या शैलीत वाचन केले.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. सुरुवातीला महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होईल, असे चित्र होते. मात्र, आता दोन्ही आघाड्यांमधील मित्रपक्षांमध्येच मतभेद निर्माण झाल्याने निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे. कोणता पक्ष कोणाची मते मिळवणार आणि कोणाच्या मतांमध्ये फूट पडणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या निवडणुकीतील प्रमुख तीन उमेदवारांची धाकधूक वाढली असून, निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
धुळे-सुरत महामार्गावर पानबारा जवळ दोन कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. एका कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या कंटेनरला धडक बसली. या अपघातात मध्य प्रदेशचे रवी राजावत आणि राजस्थानचे परमेश्वर तेजसिंह हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि रुग्णवाहिका पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
* महाराष्ट्रातील बहुतांश तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे.
* पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातही चित्र काही वेगळे नाही.
* यावर्षी पाऊस कमी झाल्याने येथे पाण्याची उपलब्धता कमी आहे.
* तसेच शेतीक्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. परंतु तरीही या तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्याच्या यादीत झाला नाही.
* मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण याची नोंद घेऊन मुळशी तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यांच्या यादीत करावा.
तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या माळेनिमित्त देवीची विशेष रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली. यावेळी तुळजाभवानी मातेला शिवकालीन दागिन्यांनी सजवण्यात आले. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान सूर्यनारायणांनी त्रिलोक भ्रमणासाठी श्री देवीला आपला रथ दिला होता. या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा केली जाते. दरम्यान, नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूरमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
डोंबिवली परिसरात एमआयडीसीच्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे समोर आले आहे. डोंबिवली एमआयडीसी निवासी सर्व्हिस रोड, कल्याण-शीळ रोड आणि दावडी नाक्याजवळ ही गळती सुरूच आहे. एकीकडे पाणीकपातीमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे एमआयडीसी प्रशासनाच्या दुरुस्तीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, गळती तातडीने रोखण्याची मागणी होत आहे.
मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला
ज्ञानेश कुमारांविरोधात सातत्याने सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची
दिल्लीत आणि मुंबई उद्या पुन्हा सीजेपीचं आंदोलन
आंदोलनात विरोधी पक्ष म्हणून सातत्याने भूमिका मांडण्याबाबत बैठकीत चर्चा असल्याची माहिती
धारशिव शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रश्नावर आज राज्य तक्रार निवारण समितीची बैठक
धारशिव जिल्ह्यातील सण २०२५ पीक विमा योजनेत तांत्रिक उत्पादनाच्या आधारावर वगळण्यात आलेल्या १४ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती.
तसेच अन्य ४३ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांच्या प्रकरणांचाही विचार व्हावा, अशी स्थिती होती.
शेतकऱ्यांना पिक कापणी प्रयोग द्वारे उत्पादनाच्या आधारावर विमा भरपाई मिळावी अशी मागणी
यासाठी राज्य तक्रार निवारण समितीची बैठक घ्यावी, अशी पाठपुरावा आमदार कैलास पाटील यांच्याकडून करण्यात आला होता
एसटी खात्याच्या मंत्र्यांसोबत बैठका होऊन झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही, अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी परिवहन मंत्र्यांवर निशाणा साधला.
भत्ता लागू करण्यासंदर्भात तीन महिने उलटून देखील भत्ता दिला जात नाही, असाही स्पष्ट करत एसटी महामंडळाच्या कारभारावर पडळकरांनी टीका केली
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात एसटी कर्मचारी संघटनेकडून संप पुकारण्यात आलाय. या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही पडळकर म्हणाले.
नवी दिल्ली -
10 ऑक्टोबरच्या दिल्लीतील आंदोलनाप्रकरणी केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल
केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या माध्यमातून दाखल प्रतिज्ञापत्रात कोर्टाच्या आदेशांचे जाणूनबुजून उल्लंघन केल्याचा आरोप फेटाळला
दिल्ली पोलिसांच्या विनंतीवरून गोंधळ रोखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद केल्याचा केंद्र सरकारचा दावा
रायसीना हिलच्या 4 किलोमीटर परिसरात 9 ऑक्टोबर रात्री 10 ते 10 ऑक्टोबर रात्री 10 वाजेपर्यंत इंटरनेट बंद
वाई-फाय आणि ब्रॉडबँड सेवांवर इंटरनेट बंदीचा कोणताही परिणाम झाला नसल्याच केंद्राच स्पष्टीकरण
दिल्ली - महाराष्ट्रात SIR मधून नावे वगळल्याचा मुद्दा सुप्रीम कोर्टात
३३% मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा.
तातडीनं सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्या दुष्काळ जाहीर
याठिकाणी दुसरा ट्रिगर लागू करण्यात आला
शासनादेश जारी झाले असून शेतकऱ्यांना सवलतींची आशा आहे
एसटी प्रवाशांना मोठा दिलासा, भाडेवाढ होणार नाही
दुष्काळाच्या संकटात जनतेला भाडेवाढीचा चटका कशाला?
१५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर
‘एसटी तोट्यात असली, तरी सर्वसामान्यांच्या खिशावर भार टाकणार नाही
संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभे राहणे हेच आमचे कर्तव्य!’
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
बारामती-मोरगाव रस्त्यावर कारला अपघात झाला.
या कारमध्ये १८ वासरे कोंबून नेली जात होती
या अपघातात दोन वासरांचा मृत्यू झाला
इतर वासरे जखमी झाल्याची माहिती आहे.
छत्रपती संभाजीनगर शहराजवळील हरसूल तलावाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. 12 वर्षांनंतर तलावातील पाणीपातळी 10 फुटांवर आली आहे.
2014 पासून हा तलाव कधी कोरडा पडला नाही. मात्र यंदा कोरडा पडण्याची शक्यता आहे. शहरातील विविध 13 वॉर्डांना या तलावातून पाणीपुरवठा केला जातो.
गेल्या वर्षी तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला होता; मात्र यंदा ऑक्टोबर महिन्यातच पाणीसाठा घटल्याने शहरातल्या जुन्या भागात पाणीपुरवठ्यसाठी अडचण होणार आहे.
ही स्थिती लक्षात घेऊनच 13 वॉर्डांना जायकवाडीचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन जलकुंभ बांधण्यात येत असून, जलवाहिनी जोडण्याचे काम अद्याप बाकी आहे.
हे काम पूर्ण झाल्यानंतर या वॉर्डांना जायकवाडीचे पाणीपुरवठा करता येणार आहे.
महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसुबाई शिखरावरील कळसुबाई मंदिराला नवरात्री निमित्ताने, आदिवासी वारली चित्रकलेची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
प्रसिद्ध वारली चित्रकार रमेश साबळे आणि पूजा साबळे यांनी आदिवासी संस्कृती, परंपरा, तारपा नृत्य, होळीचा सण आणि निसर्गदेवतेची चित्रे साकारली आली आहेत.
शिखरावरील मंदिरात घटस्थापना करण्यात आली असून, परिसरात सौरदिवाही बसवण्यात आला आहे.
शिखरावर येणाऱ्या भाविकांनी स्वच्छता राखावी आणि सोबत आणलेला कचरा तसेच पाण्याच्या बाटल्या खाली घेऊन याव्यात, असे आवाहन जहागीरदारवाडीच्या ग्रामस्थांनी केले आहे.
नवरात्री निमित्ताने कळसुबाईच्या दर्शनासाठी भाविकभक्त मोठी गर्दी करत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचा संपात सहभागी होण्याचा कर्मचाऱ्यांना आवाहन
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
प्रलंबित आर्थिक मागण्या मान्य न झाल्यास संपाचा इशारा
एसटी कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या ७ तारखेला करण्याची मागणी
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ६० टक्के महागाई भत्ता लागू करण्याची मागणी
भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त (वाचन प्रेरणा दिन) राज्यभरात 'चला शाळेत जाऊया अभियान' राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील किसन नगर येथील शाळा क्रमांक २३ ला विशेष भेट दिली.
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बालपणीच्या आठवणींची शाळा
विशेष म्हणजे, ठाण्यातील हीच ती शाळा आहे जिथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या शाळेला भेट देऊन संपूर्ण परिसर आणि वर्गखोल्यांची पाहणी केली. या वेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधला, त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षण मंत्र्यांच्या या भेटीमुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
अहिल्यानगर आणि पुणे परिसरात असलेल्या 'संदीप उद्योग समूहा'वर आयकर विभागाने मोठा छापा टाकला. पुणे येथील आयकर विभागाच्या पथकाने अहिल्यानगरमध्ये एकाच वेळी विविध ठिकाणी धाडी टाकत तपासणी सुरू केली. ही झाडाझडती सलग १२ तासांहून अधिक काळ म्हणजेच रात्री उशिरापर्यंत सुरू होती. संदीप उद्योग समूहाची अहिल्यानगरमधील पुणे रस्त्यावर 'हॉटेल सचिन', 'हॉटेल उदयनराजे' आणि 'संदीप प्राईड' अशी तीन नामांकित हॉटेल्स आहेत. याव्यतिरिक्त पुण्यातही या समूहाची हॉटेल आहेत. गेल्या वर्षी कोतकर कुटुंबीयांनी ७ सीटर हेलिकॉप्टर खरेदी केले होते, ज्यामुळे हा उद्योग समूह संपूर्ण राज्यात चर्चेत आला होता. आयकर विभागाने केलेल्या अचानक कारवाईमागील नेमके कारण किंवा किती रुपयांची बेहिशोबी मालमत्ता अथवा करचोरी समोर आली, याबाबत अद्याप आयकर विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
देशात सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा जोरदार सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. अनेक केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरवड गावात एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना घडली आहे. पत्नी अनेक महिन्यांपासून माहेरी राहत असून सासरी का येत नाही, या कारणावरून जावयाने पत्नी आणि सासूवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून सासू गंभीर जखमी झाली आहे.
कमलाबाई प्रभाकर पाईकराव (सासू) आणि दिपाली विशाल डोंगरे (मृत पत्नी) अशी या हल्ल्यातील महिलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाला. पत्नी सासरी येत नसल्याच्या कारणावरून जावयाने जाब विचारण्यास सुरुवात केली. यादरम्यान पती-पत्नीच्या भांडणात सासू मध्यस्थी करण्यासाठी आली असता, संतापलेल्या जावयाने मध्यरात्रीच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलले. झोपण्यासाठी अंगणात ठेवलेल्या बाजेच्या (खाटेच्या) लाकडाने त्याने पत्नीच्या डोक्यात जोरदार वार करून तिची निर्घृण हत्या केली.
मतदारांची मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याचा आरोप आणि मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
मुंबईतील वांद्रे पूर्वेकडील गरीब नगर झोपडपट्टीतील अवैध धार्मिक बांधकामावरील कारवाईनंतर धमकी दिल्याचे प्रकरण.
अवैध मशीद तोडण्याचे समर्थन करणाऱ्या इम्तियाज खत्री याला धमकी मिळाल्याचा आरोप.
मुंबई क्राइम ब्रँचच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटकडून (CIU) प्रकरणाचा तपास.
धमकी देण्यासाठी वापरलेला मोबाइल क्रमांक हा लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचा तपासात संशय.
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने शफीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना अटक.
दोन्ही आरोपी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबासाठी सक्रियपणे काम करत असल्याचा पोलिसांचा संशय.
पिंपरी चिंचवड शहरातील बोराडेवाडी परिसरातील मंत्रा मोमेंट्स हाऊसिंग कॉम्प्लेक्स मधील कमर्शियल ऑफिसमध्ये 12 ऑक्टोंबर च्य मध्यरात्री
प्रियंका आकाश कांबळे वय 30 वर्ष या महिलेची धारदार शस्त्राने गळा आणि चेहऱ्यावर सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. प्रियंका आकाश कांबळे हिच्या मारेकऱ्यांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अवघ्या काही तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.
परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या कलम ३७-अ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जप्त मालमत्तांमध्ये कंपनीच्या बँक खात्यांतील शिल्लक आणि सासन पॉवर लिमिटेडमधील भागभांडवलाचा समावेश आहे.
परदेशात कथितरीत्या नियमबाह्य पद्धतीने ठेवण्यात आलेल्या परकीय चलनाच्या सममूल्याची मालमत्ता भारतात जप्त करण्यात आल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.
सेबीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू झाला. रिलायन्स पॉवरच्या लेखा नोंदींमध्ये परदेशातील गुंतवणूक आणि आगाऊ रकमेबाबत एकूण २,१०१.४६ कोटी रुपयांच्या राइट-ऑफ किंवा तरतुदी करण्यात आल्याचे या माहितीमध्ये नमूद होते
- 17 ऑक्टोबर नंतर नागपूरसह विदर्भातील काही भागात पावसाचा येल्लो अलर्ट
- बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं परतीच्या पावसाची शक्यता वाढली
- परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा आणि नुकसान दोन्ही होणार, काढणीला आलेल्या शेतमालाचे नुकसान तर कापूस, धान, संत्रा पिकांना फायदा होणार अशी आशा...
पुणे म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आता २२ ऑक्टोबरपर्यंत
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे मुदतवाढीचा निर्णय
पुणे मंडळाच्या ४ हजार ४६२ घरांसाठी सोडत जाहीर
यापूर्वी १५ ऑक्टोबर होती अर्ज करण्याची अंतिम तारीख
म्हाडाच्या घरांसाठी आतापर्यंत १ लाख ६५ हजारांहून अधिक अर्ज दाखल
३ हजार ८०० हून अधिक अधिवास प्रमाणपत्रे आणि ९ हजारांहून अधिक उत्पन्नाचे दाखले पडताळणीसाठी प्रलंबित
पुणे आणि सांगली जिल्ह्यातील सहा आस्थापनांवर कारवाई
मिठाई, वेफर्स, चकली, भगर आणि साबुदाण्याचा ४ लाख ४६ हजार रुपयांचा साठा जप्त
विटा येथील श्री बालाजी स्वीट मार्टमधून ६ किलो जिलेबी आणि म्हैसूर पाक जप्त
सिरवी बंधू मिठाईवाले येथून २७ किलो बुंदी लाडू आणि म्हैसूर पाक जप्त
कवठेपिरान येथील रुचिरा स्वीट्समधून ७२ किलो नारळ बर्फी आणि म्हैसूर पाक जप्त
पुण्यातील बिबवेवाडी येथील आशिष फूड्समधून २१० किलो बनाना वेफर्स,तर रेड्डी स्वीट हाऊसमधून ७५.६ किलो चकली जप्त
मार्केटयार्ड येथील समीर सेल्समधून १ हजार २९८ किलो भगर आणि २ हजार ९९८ किलो साबुदाणा जप्त
दुर्मिळ बोर्ना स्नेकहेड माशाच्या तस्करीच्या मुद्यावर सरकारने लक्ष द्यावे यासाठी थेट केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.