Bajaj CNG Bike  Saam Tv
बिझनेस

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Bajaj CNG Bike: पेट्रोलच्या वाढत्या किमती पाहता अनेक लोक सीएनजी बाईकची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, 18 जून 2024 रोजी बजाजची नवीन सीएनजी बाईक लॉन्च होणार असल्याची चर्चा आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bajaj CNG Bike:

पेट्रोलच्या वाढत्या किमती पाहता अनेक लोक सीएनजी बाईकची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, 18 जून 2024 रोजी बजाजची नवीन सीएनजी बाईक लॉन्च होणार असल्याची चर्चा आहे. ही बाईक कशी असेल? किती मायलेज देईल आणि यात कोणते फीचर्स मिळणार, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

मायलेजसह स्टायलिश लूक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही बाईक 100 ते 125 सीसी इंजिन पर्यायांमध्ये सादर करेल. यात डिस्क ब्रेक आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम यांसारख्या अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स दिले जाऊ शकतात. मात्र कंपनीने या बाईकची किंमत आणि इतर तपशील अद्याप जाहीर केलेला नाही.

ही बाईक 1 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध होऊ शकते. यात दोन ते पाच किलो गॅस क्षमतेचे सिलिंडर मिळू शकतात. ही बाईक 80 ते 90 किलोमीटर प्रति किलो मायलेज देईल.

बजाज सीएनजी बाईक अनेकवेळा टेस्टिंगदरम्यान स्पॉट झाली आहे. या बाईकमध्ये फ्युएल टँकवर ग्राफिक्स असतील. ही बाईक टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मोनोशॉक सस्पेन्शन पॉवरसह येईल. बाईकमध्ये एलईडी लाईट मिळू शकतात. बाईकला मोठ्या हेडलाइटसह मोठी सीट मिळेल.

Bajaj Platina मध्ये 72 kmpl चा मायलेज

बजाज प्लॅटिना ही कंपनीची एंट्री लेव्हल बाईक आहे. ज्यामध्ये 102 सीसी हाय मायलेज इंजिन आहे. ही बाईक 72 kmpl चा मायलेज देते, जी 4 स्पीड मॅन्युअल इंजिनसह येते. या बाईकचे वजन 117 किलो आहे आणि या बाईकमध्ये 11 लीटरची इंधन टाकी आहे. बाईकची सीटची उंची 807 मिमी आहे, ज्यामुळे कमी उंचीचे लोकही ती सहज चालवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील विद्यार्थी दिल्ली विमानतळावर अडकले

Friday Horoscope : वरिष्ठांच्या आशीर्वादाने यश मिळेल; आजचा दिवस ठरणार ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट

Crime News: शिवरस्त्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दाखवली पिस्तूल; चक्क पोलिसांसमोरच धमकावलं| व्हिडिओ व्हायरल

मध्य रेल्वेच्या आणखी एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलले; आता नवीन नाव काय?

Amla Murabba Recipe: थंडीत आवळा मुरंबा कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT