New Force Gurkha: ऑफ-रोडींगसाठी आहे बेस्ट! पॉवरफुल Force Gurkha भारतात लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

2024 Force Gurkha Launched : प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी फोर्स मोटर्सने महिंद्र थार 5-डोरला टक्कर देण्यासाठी आपली नवीन फोर्स गुरखा लॉन्च केली आहे. फोर्स गुरखा ही भारतातील सर्वोत्तम ऑफ-रोड एसयूव्हींपैकी एक आहे.
2024 Force Gurkha Launched
2024 Force Gurkha LaunchedSaam Tv

2024 Force Gurkha Launched :

प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी फोर्स मोटर्सने महिंद्र थार 5-डोरला टक्कर देण्यासाठी आपली नवीन फोर्स गुरखा लॉन्च केली आहे. फोर्स गुरखा ही भारतातील सर्वोत्तम ऑफ-रोड एसयूव्हींपैकी एक आहे.

कंपनीने बहुप्रतिक्षित 5-डोअर गुरखा सोबत अपडेटेड 3-डोर फोर्स गुरखा देखील लॉन्च केली आहे. नवीन फोर्स गुरखा 3-डोर व्हेरियंटची किंमत 16.75 लाख रुपये आहे आणि नवीन 5-डोअरव्हेरिएंटची किंमत 18 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने 2024 फोर्स गुरखासाठी बुकिंग सुरु केली आहे. इच्छुक ग्राहक 25,000 रुपये टोकन रक्कम भरून ही SUV बुक करू शकतात. 2024 फोर्स गुरखाची डिलिव्हरी या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल.

2024 Force Gurkha Launched
3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

फोर्स गुरखा एसयूव्ही पहिल्यांदाच पाच-डोअर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. कंपनीने ही 7-सीट कॉन्फिगरेशनसह सादर केली आहे. नवीन 5-डोअर मॉडेलची लांबी 4,390 मिमी, रुंदी 1,865 मिमी आणि उंची 2,095 मिमी आहे. याचा व्हीलबेस 2,825 मिमी लांब आहे.

3-डोअर गुरख्याची लांबी 3,965 मिमी, रुंदी 1,865 मिमी, उंची 2,080 मिमी आणि व्हीलबेस 2,400 मिमी आहे. गुरखा SUV ला साइड टायर्स (255/65 R18) वर नवीन आकर्षक 18-इंच अलॉय व्हील्स मिळतात.

2024 Force Gurkha Launched
Toyota Rumion कार भारतात लॉन्च, मोठ्या फॅमिलीसाठी आहे बेस्ट; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

फोर्स गुरखा पॉवरट्रेन

फोर्स गुरखाच्या दोन्ही व्हेरियंटमध्ये पॉवरफुल Mercedes-sourced 2.6-लिटर OM616 टर्बोडीझेल इंजिन मिळते. हे इंजिन 3,200rpm आहे. तसेच हे 1,400 आणि 2,600rpm दरम्यान 138bhp आणि 320Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन अजूनही 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि फोर-व्हील ड्राइव्हसह दिले जाते.

फीचर्स

या एसयूव्हीच्या आतील भागात 9-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे. हे Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते. नवीन गुरखाची ऑल-मेटल बॉडी फ्रंट डिझाईनमध्ये Crash-complaint आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com