Bajaj Freedom 125 CNG Waiting Period Saam TV
बिझनेस

Bajaj च्या CNG बाईकची बाजारात तुफान मागणी! आज बुक केल्यास कधी मिळणार डिलिव्हरी? जाणून घ्या

Satish Kengar

बजाज ऑटोने अलीकडेच जगातील पहिली CNG बाईक भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने देशभरात आपली बुकिंग सुरू केली असून यासोबतच या बाईकचा प्रतीक्षा कालावधीही वाढला आहे. म्हणजेच आता ही बाईक घरी आणण्यासाठी तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागणार आहे. या बाईकची किंमत 95,000 रुपयांपासून सुरू होते. ही बाईक पेट्रोल आणि सीएनजीवर धावते. ग्राहक 1,000 रुपये टोकन रकम देऊन ही बाईक बुक करू शकतात.

किती आहे प्रतीक्षा कालावधी?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईत या बाईकसाठी जवळपास 30 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी आहे. तर पुण्यात बाईकचा प्रतीक्षा कालावधी 30 ते 45 दिवसांवर पोहोचला असून गुजरातमध्ये 45 दिवस ते तीन महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी पोहोचला आहे.

बजाज म्हणाले की, पहिली फ्रीडम 125 बाईक पुण्यात राहणाऱ्या प्रवीण थोरात यांना देण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की, ही बाईक पेट्रोल बाईकच्या तुलनेत खूप किफायतशिर असून पर्यावरणासाठी देखील चांगली आहे. बजाज फ्रीडम सीएनजी बाईक 3 प्रकारात उपलब्ध असेल. यात कॅरिबियन ब्लू, सायबर व्हाईट, इबोनी ब्लॅक/ग्रे आणि रेसिंग रेड कलर पर्याय उपलब्ध आहेत.

बजाजच्या नवीन फ्रीडममध्ये 125cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 9.5 PS पॉवर आणि 9.7 Nm टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड गिअरबॉक्सची सुविधा आहे. 125cc मध्ये हे एकमेव इंजिन आहे जे CNG+ पेट्रोलवर काम करते. इंजिनला अशा प्रकारे ट्यून केले गेले आहे की ते सर्व प्रकारच्या हवामानात चांगला परफॉर्मन्स देऊ शकते.

बजाज फ्रीडम 125 मध्ये फक्त 2 किलोचा CNG सिलेंडर आहे आणि तो पूर्ण फुल केल्यावर 200 किलोमीटर धावेल, असं कंपनीचं म्हणणं आहे. तर यात फक्त 2 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे, ज्यामुळे ही बाईक 130 किलोमीटरपर्यंत धावेल. एकूणच ही बाईक 330 किलोमीटर (CNG + पेट्रोल) पर्यंत धावेल.

फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल स्पीडोमीटर, सीएनजी आणि हँडलबारवरील पेट्रोल शिफ्ट बटण, यूएसबी पोर्ट, मोठी सीट आणि गियर शिफ्ट इंडिकेटर यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT