Atal Pension Yojana Saam TV
बिझनेस

Atal Pension Yojana: सरकारची जबरदस्त योजना! फक्त २१० रुपये गुंतवा अन् महिन्याला ₹५००० पेन्शन मिळवा

Atal Pension Yojana: अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला महिन्याला फक्त ४२ रुपये गुंतवायचे आहेत. त्यानंतर महिन्याला १००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

Siddhi Hande

अटल पेन्शन योजना

योजनेत महिन्याला फक्त ४२ रुपये गुंतवा अन् आयुष्यभर पेन्शन मिळवा

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी योजना

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूक करुन सर्वसामान्यांना आर्थिक मदत होते. अशीच एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांसाठी ही चांगली योजना आहे. अटल पेन्शन योजना ९ मे २०१५ रोजी सुरु करण्यात आली होती.

अटल पेन्शन योजनेत तु्म्ही कमीत कमी रुपये गुंतवून जास्तीत जास्त परतावा मिळवू शकतात. या योजनेत १८ ते ४० वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात. या योजनेत तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर १००० ते ५००० रुपयांची पेन्शन मिळणार आहे.

अटल पेन्शन योजनेत तुम्ही जितकी वर्ष गुंतवणूक कराल त्यावर किती पेन्शन मिळणार हे ठरवले जाते. या योजनेत तुम्ही महिन्याला, तिमाही आणि सहा महिन्यांनी गुंतवणूक करु शकतात. या योजनेत पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर त्याच्या नॉमिनीला पेन्शन मिळणार आहे.

या योजनेत तुम्हाला टॅक्समध्ये सूट मिळते. तुम्हाला 80CCD टॅक्स सूट मिळते. या योजनेत तुम्हाला दर महिन्याला गुंतवणूक करायची आहे.

तुम्ही जर १८ व्या वर्षी गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगली पेन्शन मिळणार आहे. तुम्ही ४२ रुपये मासिक गुंतवणूक करुन १००० रुपयांची पेन्शन मिळवू शकतात. जर तुम्हाला दर महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर २१० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही ४० व्या वर्षी गुंतवणूक करायची असेल तर महिन्याला २९१ रुपयांची गुंतवणूक करायची आहे तेव्हा तुम्हाला १००० रुपयांची पेन्शन मिळेल. तुम्हाला ५००० रुपयांच्या पेन्शनसाठी १४५४ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : अजितदादांचा अखेरचा प्रवास सुरू, बारामतीकरांचा टोहो

Plane Crash: हवाई अपघातांत 'हे' दिग्गज मृत्यूमुखी

Airplane Colour: विमाने पांढऱ्याच रंगाची का असतात? जाणून घ्या पांढऱ्या रंगाचं महत्व

Maharashtra Live News Update : अजित पवार यांचे पी एस ओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

Kitchen Hacks : एअर फ्रायर कसा साफ करावा? जाणून घ्या 'या' सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT