NPS Vatsalya Scheme: केंद्र सरकारची खास योजना! १००० रुपयांची गुंतवणूक करा, ६० वर्षानंतर मिळणार ११.५७ कोटी

NPS Vatsalya Scheme: केंद्र सरकारने एनपीएस वात्सल्य योजना सुरु केली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित होणार आहे. या योजनेत गुंतवणूक करुन तुम्ही ११.५७ कोटींचा फंड मिळवू शकता.
NPS Scheme
NPS SchemeSaam Tv
Published On
Summary

एनपीएस वात्सल्य योजना

लहान मुलांसाठी सरकारची खास योजना

मिळणार ११.५७ कोटी रुपये

प्रत्येकजण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी गुंतवणूक करण्याचा विचार करतात. मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, या दृष्टीने एक एनपीएस योजना सुरु केली आहे. एनपीएस वात्सल्य योजनेत गुंतवणूक केल्यावर तुमच्या मुलांना भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. त्यांना उच्च शिक्षणासाठी या पैशांचा उपयोग होणार आहे.

NPS Scheme
EPFO Update: EPFO कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश

एनपीएस वात्सल्य योजना ही १८ सप्टेंबर २०२४ मध्ये सुरु झाली होती. या योजनेत आईवडिल आपल्या मुलांच्या नावाने गुंतवणूक करतात. मुलांसाठी लाँग टर्म सेव्हिंग करतात. या योजनेत १८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांच्या नावाने गुंतवणूक केली जाईल. यामध्ये भारतीय आणि एनआरआय लोकदेखील अकाउंट उघडू शकतात. हे अकाउंट त्यांच्या आईवडिलांद्वारे चालवले जाते.

एनपीएस वात्सल्य योजनेत तुम्ही वर्षाला २५० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्ही ३ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पैसे काढू शकतात.यामधील २५ टक्के रक्कम ही शिक्षण, मेडिकल यासाठी काढू शकतात. या योजनेत तुम्ही १८ ते २१ या वयोगटात दोनदा पैसे काढू शकतात.

NPS Scheme
MNREGA Scheme: मोठी बातमी! मनरेगा योजनेचे नाव बदलणार, मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

११.५७ कोटींचा फंड

या योजनेत मुलगा १८ वर्षांचा झाल्यावर केवायसी करणे अनिवार्य आहे. यामध्ये तुम्ही जर पैसे काढले तर ८० टक्के रक्कम काढू शकता. त्यामधील २० टक्के रक्कम अॅन्युटीमध्ये गुंतवली जाणार आहे. यामध्ये तुम्ही ८ लाखांपर्यंतची रक्कम तुम्ही काढू शकतात.या योजनेत तुम्ही १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकतात. यामध्ये तुम्हाला ९ टक्के परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्ही वयाच्या ६० वर्षापर्यंत ११.५७ कोटी रुपये मिळवू शकतात.

NPS Scheme
DDA Housing Scheme : राजधानीत फक्त १० लाखांत आलिशान घर, DDA ची हाऊसिंग स्कीम लॉन्च, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com