Airtel Saam Tv
बिझनेस

Airtel: एअरटेल युजर्सला दुहेरी झटका, आधी रिचार्ज प्लान महागले; आता कोट्यवधी लोकांचा डेटाही गेला चोरीला?

Siddhi Hande

एअरटेल युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. एअरटेल युजर्सचा डेटा हॅक करुन तो विकला जात आहे, असं सांगण्यात येत आहे. मात्र, एअरटेलने या सर्व गोष्टी नाकारल्या आहेत. एअरटेलने आपल्या निवेदनात कोणाचाही डेटा हॅक न झाल्याचे म्हटले आहे.

हॅक झालेल्या डेटामध्ये युजर्सचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, कुटुंबाची माहिती, आधार कार्डची माहिती या गोष्टींचा समावेश आहे, असं सांगण्यात आलं होते. एका सोशल मिडिया पोस्टद्वारे ही माहिती देण्यात आली होती. त्या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, xenZen एअरटेल युजर्सचा डेटा अनधिकृतपणे विकत आहे. ही डेटा डार्क वेबवर विकला जात आहे. ब्रीजफोरम नावाच्या समुदायामध्ये हा डेटा विकला जात आहे.जवळपास ३७५ मिलियन युजर्सचा डेटा हॅक झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

या माहितीत असा दावा केला जात आहे की, जून २०२४ मध्ये हा डेटा लीक झाला आहे. या माहितीत युजर्सची सर्व वैयक्तिक माहितीचा समावेश आहे.

एअरटेलने या ब्रीचचे वृत्त फेटाळले आहे. एअरटेलने सांगितले की, प्रारंभिक तपासणीच्या आधारे एअरटेलच्या सिस्टीममध्ये कोणताही डेटा चोरीला गेलेला नाही.

याआधीही अनेक मोठ्या कंपन्यांचा डेटा चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. भारतीय ऑडिओ कंपनी boAt च्या ग्राहकांचा डेटा लीक झाला होता. जवळपास ७.५ कोटी युजर्सचा डेटा लीक झाल्याचे सांगण्यात येत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral News : रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक; मंचावरच सोडला जीव, धक्कादायक VIDEO

Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

Hypertension and High Cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास? वाचा तज्ज्ञांनी काय काय सांगितलं

Bigg Boss Marathi Grand Finale: ग्रँड फिनालेच्या मंचावर इरिना-वैभवच्या धमाकेदार डान्सचा जलवा

Sabudana Role Recipe: उपवासाठी तयार करा झटपट साबूदाणा रोल्स, वाचा परफेक्ट रेसिपी

SCROLL FOR NEXT