Bajaj CNG Bike: जगातील पहिली CNG बाईक Freedom आज होणार लॉन्च, जबरदास्त फीचर्ससह किती आहे किंमत?

New Bajaj CNG Bike: आज जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च होणार आहे. या बाईकचे नाव 'बजाज फ्रीडम 125 सीएनजी', असं आहे. याच बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
जगातील पहिली CNG बाईक Freedom आज होणार लॉन्च, जबरदास्त फीचर्ससह किती आहे किंमत?
Bajaj CNG Bike Freedom 125Saam Tv

प्रसिद्ध दुचाकी उत्पदक कंपनी बजाज आज (4 जुलै ) देशातील आणि जगातील पहिली CNG बाईक लॉन्च करणार आहे. कंपनीने या बाईकला 'बजाज फ्रीडम 125 सीएनजी' असे नाव दिले आहे. बाइकमध्ये 125cc इंजिन ग्राहकांना मिळेल.

कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर या नावाने ही CNG बाईक लिस्ट केली आहे. जर तुम्हाला ही बाईक खरेदी करायची असेल तर तुम्ही त्याची नोंदणी देखील करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे नाव, फोन नंबर आणि ईमेल आयडीची माहिती द्यावी लागेल. याचे तपशील तुमच्या व्हॉट्सॲपवरही उपलब्ध असतील.

जगातील पहिली CNG बाईक Freedom आज होणार लॉन्च, जबरदास्त फीचर्ससह किती आहे किंमत?
Tata, Maruti आणि Hyundai ची नवीन CNG कार लवकरच होणार लॉन्च; दमदार फीचर्ससह किती असेल किंमत?

बजाज सीएनजी बाईकला 125cc इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे. CNG ची ऊर्जा पेट्रोलपेक्षा कमी असते, त्यामुळे बजाज CNG बाईकची परफॉर्मन्स 100cc कम्युटर बाईकच्या बरोबरीची असू शकते. यातच ही पहिलीच सीएनजी बाईक किती मायलेज देणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे की, ही बाईक 100cc कम्युटर बाईक इतका किंवा त्यापेक्सह जास्तच मायलेज देऊ शकते. म्हणजेच ही बाईक सुमारे 70 ते 90 किंवा अगदी 100 किमी/ली मायलेज देऊ शकते.

बजाज सीएनजी बाईकला सुमारे 5 लिटरची छोटी पेट्रोल टाकी मिळेल. याशिवाय सुमारे 4-5 किलोची मोठी सीएनजी टाकीही मिळेल. बाईकमध्ये मजबूत टँक, सिल्व्हर कलर ॲक्सेसरीज, राउंड हेडलाइट, हँडलबार ब्रेसेस, नकल गार्ड आणि फ्रंट डिस्क ब्रेक असतील.

जगातील पहिली CNG बाईक Freedom आज होणार लॉन्च, जबरदास्त फीचर्ससह किती आहे किंमत?
Hero ने लॉन्च केली नवीन कार्बन फायबर बाईक, फक्त 'हेच' लोक खरेदी करू शकतील

बाईकमध्ये उंच सीट, चांगला ग्राउंड क्लिअरन्स मिळू शकतो. यात मोठा साइड पॅन, स्टायलिश बेली पॅन, 5-स्पोक अलॉय व्हील्स, पिलियनसाठी मजबूत ग्रॅब रेल, रिब्ड सीट, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, मागील मोनो-शॉक सेटअप आणि अनेक रंग पर्याय यात मिळू शकतात. दरम्यान, याच्या किंमतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. कंपनी लॉन्चिंगवेळी याची किंमत जाहीर करू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com