Ack Saam Tv
बिझनेस

Ack: अ‍ॅकोचा आयुर्विमा क्षेत्रात प्रवेश; अशा प्रकारची आहेत भन्नाट फिचर्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाविन्यपूर्ण वाहने आणि आरोग्य विमा उत्पादनांच्या माध्यमातून सामान्य विमा क्षेत्राच्या मनाचे कारभार मोडल्यानंतर अॅको टेक या अॅको जनरल इन्शुरन्सच्या पालक कंपनीने अॅको लाइफ इन्शुरन्स या आपल्या नवीन विभागाची घोषणा केली आहे. याद्वारे क्रांतिकारी फ्लेग्झी टर्म लाइफ इन्शुरन्स प्लान कंपनीने आणला आहे.

अॅको फ्लेग्झी टर्म हे एक सर्वसमावेशक उत्पादन (production) ग्राहकाला संपूर्ण आयुष्यभर मन:शांती आणि संरक्षण देऊ करते. वाजवी दर, सोय आणि ग्राहकांना श्रेष्ठ दर्जाचा अनुभव देणे या अॅकोच्या मुख्य तत्त्वांना अनुसरून तयार करण्यात आलेले हे उत्पादन ग्राहकांच्या बदलत्या गरजांची पूर्तता करण्यास सक्षम आहे. अॅको मुदत आयुर्विमा योजना ग्राहकांना गरजेनुसार संरक्षणाची रक्कम किंवा मुदतीत बदल करण्याची लवचिकता आणि संरक्षण पुरवते.

अॅकोचे संस्थापक वरुण दुआ या योजनेबद्दल म्हणाले,''आयुष्यातील अनिश्चितता आणि ग्राहकांच्या आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर बदलत जाणाऱ्या गरजा यांची जाणीव अॅकोला आहे. ग्राहकांनी आयुर्विम्याकडे गुंतवणूकीचे साधन म्हणून न बघता त्यांच्या आणि कुटुंबियांच्या संरक्षणाचा मार्ग म्हणून बघावे असे आम्हाला वाटते. भविष्यकाळातही आमचा भर पूर्णपणे संरक्षणकेंद्री उत्पादने देण्यावर कायम राहील.

अॅकोच्या तंत्रज्ञानातील कौशल या सर्वांच्या गोष्टींवर विमा उद्योगाला नवीन दिशा देण्याचे उद्दिष्ट आता समोर आहे. आम्ही थेट ग्राहकाला डिजिटलकेंद्री अनुभव देण्याचा प्रयत्न करू आणि त्याद्वारे उद्योगक्षेत्रात नवीन मापदंड स्थापन (Establishment)करू. प्रत्येक ग्राहकांसाठी चांगली उत्पादने देणे या सर्व गोष्टीं आम्ही कायम राखू.

फ्लेग्झी टर्म प्लान केवळ सर्वसमावेशक संरक्षणच देऊ करत नाही, तर ग्राहकांना त्यांच्या बदलत्या गरजांनुसार त्यांचे संरक्षण कस्टमाइझ करण्याची आणि समायोजित करण्याची मुभा देते. त्यामुळेच हे उत्पादन भविष्यकाळात खऱ्या अर्थाने बाजारपेठेतील (markets) ‘गेम चेंजर’ ठरणार आहे.”

उत्पादनाची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये

पॉलिसीधारक संरक्षण (Protection) वाढवण्यासाठी रायडर्स वाढवू किंवा बदलू शकतात, आपल्या विशिष्ट गरजांनुसार आणि आयुष्यातील टप्प्यांनुसार पॉलिसीची आखणी करून घेऊ शकतात, उदाहरणार्थ गंभीर स्वरूपाचा आजार किंवा अपघाती मृत्यू या शक्यता लक्षात घेऊन संरक्षण घेऊ शकतात.

या योजनेद्वारे डिजिटल विल नावाची एक सुविधा (Facility) नव्याने देण्यात आली आहे, त्यामुळे ग्राहकाला त्याचे इच्छापत्र सहजगत्या तयार करणे, त्यात बदल करणे आणि ते ऑनलाइन मार्गाने सुरक्षितपणे सेव्ह करून ठेवणे शक्य होणार आहे, जेणेकरून त्याच्या/तिच्या इच्छांना कायदेशीर मान्यता मिळेल आणि त्यांच्या जवळच्या व्यक्ती संरक्षित राहतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT