Ranbhaji Mahotsav : पावसाळ्यातील रानभाज्यांनी सजली बाजारपेठ; कोल्हापूरसह गडचिरोलीत महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद

Kolhapur Ranbhaji Mahotsav : महोत्सवाला पंचक्रोशीतील शाळा महाविद्यालय यांच्यासह अनेक बचत गट आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद नोंदवला आहे. रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे जीवनसत्व असतात.
Kolhapur Ranbhaji Mahotsav
Ranbhaji MahotsavSaam TV
Published On

रणजीत माजगावकर

कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे रानभाज्या महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून राधानगरी तालुका कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या रानभाज्या महोत्सवात 100 पेक्षा अधिक रानभाज्यांचा समावेश आहे.

Kolhapur Ranbhaji Mahotsav
Vegetable Rates Increases: पावसाच्या हुलकावणीमुळे भाजीपाल्यांचे दर कडाडले; कांदा-बटाट्याचे दर दुप्पट, सर्वसामान्यांचं बजेट गडबडलं

यामध्ये अमरकंद, अळंबी, अघाडा, उळशाचा मोहर, कडकिंदा, कडूकंद, करटोली, काटे-माठ, कुड्याची फुलेकुर्डू, कुसरा, कोळू, कोलासने, कोवळे बांबू, कोळू, गोमाठी, घोळ, चवळीचे बोके, चाईचा मोहर अश्या औषधी वनस्पती, फळभाज्या फुलभाज्या यांचा समावेश करण्यात आला असून या सर्व वनस्पती मानवी शरीराला गुणकारी आहेत.

या महोत्सवाला पंचक्रोशीतील शाळा महाविद्यालय यांच्यासह अनेक बचत गट आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद नोंदवला आहे. रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे जीवनसत्व असतात. त्यामुळे प्रत्येकाने आहारात या भाज्यांचा समावेश केला पाहिजे.

गडचिरोलीत रानभाजी महोत्सव

पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रानभाज्या येत होत्या. रानभाज्यांचे हे प्रमाण आता कमी होत चालले आहे. मात्र आजही खेड्या पाड्यांत रानभाज्या आलेल्या दिसतात. यावर अनेक आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह असतो. गडचिरोलीत देखील रानभाज्यांचा एक महोत्सव आहे. या महोत्सवाला देखील नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

Kolhapur Ranbhaji Mahotsav
Vegetable Rate: मुसळधार पावसाने बिघडवलं सर्वसामान्यांचं गणित, भाजीपाल्यांचे दर कडाडले; भेंडी, गवार आणि टॉमेटो शंभरीपार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com