Vegetable Rates Increases: पावसाच्या हुलकावणीमुळे भाजीपाल्यांचे दर कडाडले; कांदा-बटाट्याचे दर दुप्पट, सर्वसामान्यांचं बजेट गडबडलं

Vegetable Price Increases: राज्यात पुरेसा पाऊस न पडल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. पाणीपुरवठा कमी झाल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
 Vegetable Price
vegetables prices NewsSaam Tv

राज्यात पावसाळा सुरुवात झाली असली तरीही अपेक्षित पाऊस अजून पडलेला नाही. त्यामुळे अजूनही महाराष्ट्रात उकाडा जाणवत आहे. तसेच पाण्याची कमतरता असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाल्याच्या पिकांना मुबलक पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडले आहे. भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे.

सध्या घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमती ८० ते १०० रुपये किलो झाल्या आहेत. तर काही भाज्यांचे दर शंभरीपार गेले आहेत. बाजारात मागणीच्या तुलनेत फक्त ६० टक्केच भाजीपाल्याची आवक होते. त्यामुळे भाज्या महागल्या आहे.

सध्याचे वातावरणदेखील भाज्यांच्या पिकासाठी चांगले नाहीये. पावसाळा लांबल्यामुळे अजून महिनाभर भाज्यांची कमतरता जाणवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाज्यांसोबत हिरवा मसाला, अदकरचेही दर वाढले आहे. कोथिंबीरीची जुडी महागली आहे. याआधी हिरवा मसाला १० रुपयांना मिळायचा. तर तो आता २० रुपयांना मिळत आहे. तर कांदा बटाट्याचे भाव दुप्पट झाले आहेत. बटाट ४० ते ५० तर कांदा ५० रुपयांना विकला जात आहे.

 Vegetable Price
Manoj Jarange News : मनोज जरांगे यांच्या निधनाची खोटी बातमी वाऱ्यासारखी पसरली; तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा

राज्यात घाऊक बाजारात भेंडी ४५ ते ५० रुपयांना विकली जात आहे. तर किरकोळ बाजारात भेंडी १२०-१४० रुपयांना विकली जात आहे. फरसबी किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपयांना विकली जात आहे. गवार आणि घेवडा १०० ते १२० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. शिमला मिरची ८०-९० रुपयांना विकली जात आहे. शेवग्याची शेंग १०० ते १२० रुपये प्रति किलो विकली जात आहे. सुरण ८० ते ९० तर हिरवे मटार १८०-१२० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. हिरवी मिरची १०० ते १२० रुपयांना विकली जात आहे. भाज्यांचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

 Vegetable Price
Special Report : जरांगेंना Red Carpet आणि OBC ला दुरावा, हाकेंच्या आरोपाने खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com