ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात अनेकदा चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे आपण भजी, वडे बनवतो.
तुम्ही पावसाळ्यात हेल्दी आणि चविष्ट भेंडी फ्राइज खाऊ शकता.
भेंडी फ्राइज बनवण्यासाठी सुरुवातील भेंडी धुवून छान पुसून घ्या. त्यानंतक भेंडी उभी कापून त्यातील बिया काढून घ्या.
या भेंडीवर आमचुर पावडर किंवा लिंबाचा रस टाका. त्यावर लाल मिरची पावडर आणि जिरे पावडर टाका.
त्यानंतर त्यात तीन चमचे बेसन पीठ टाका. हे बेसन पीठ नीट मिक्स करुन घ्या.
त्यानंतर गॅसवर कढईत तेल गरम करा. या तेलात उभी चिरलेली भेंडी टाका.
भेंडी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
तुम्ही हे भेंडी फ्राइज चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकता.