ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु झाला आहे.पावसाळ्यात चहा आणि गरमागरम भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते.
चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच, असे अनेकजण म्हणतात. म्हणूनच पावसाळ्यात लोक कधीही चहा पितात.
अदरकचा गरमागरम चहा प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
आल्याचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चहा प्यायल्याने अनेक आजार पळून जातात.
पावसाळ्यात गरमागरम चहा प्यायल्याने घशाला आराम मिळतो.
चहा प्यायल्याने मन प्रसन्न होते. मन प्रसन्न झाल्याने माणसाच्या शरीरातील आळस दूर होतो.
चहा प्यायल्याने पोटात गॅसची समस्या होत नाही.
चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.