Malvan Rajkot Fort : राजकोट शिवाजी महाराज पुतळा प्रकरणाची केंद्र सरकारकडून दखल, तपासासाठी समिती स्थापन!

Rajkot Fort : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री तातडीची बैठक घेत समिती स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. आता मालवणमधील या प्रकरणाची केंद्राकडूनही दखल घेण्यात आली आहे.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, वर्षभरापूर्वी PM मोदींनी केलं होतं उद्घाटन
Sindhudurg Malvans Rajkot Fort Shivaji Maharaj StatueSaam Tv
Published On

Rajkot Fort Chhatrapati Shivaji Maharaj’s statue : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभर संताप व्यक्त होत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. विरोधकांनी नाराजी व्यक्त करत राज्यभर आंदोलन पुकारलेय. तर सत्ताधारी असणारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आज आंदोलनात उतरलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी रात्री तातडीची बैठक घेत समिती स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. आता मालवणमधील (malvan Fara) या प्रकरणाची केंद्राकडूनही दखल घेण्यात आली आहे.

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, वर्षभरापूर्वी PM मोदींनी केलं होतं उद्घाटन
Rajkot Fort : मालवण प्रकरणावरुन राज्य सरकार अलर्ट! महायुतीच्या नेत्यांची 'वर्षा'वर खलबतं; CM शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षीय या पुतळ्याचे उद्घटन केले होते. पण वर्षभरात पुतळा कोसळला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून भ्रष्ट्राचाराचा आरोप करण्यात येतोय. रवींद्र चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणीही विरोधकांकडून कऱण्यात येत आहे. राज्याकडून या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर केंद्राकडूनही दखल घेण्यात आली आहे. पुतळा का पडला याचा शोध घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, वर्षभरापूर्वी PM मोदींनी केलं होतं उद्घाटन
Rajkot Fort Rada : पोळी भाजू नका...रामदास कदम यांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं, राष्ट्रवादीच्या आंदोलनावर डागली तोफ

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नौदलाकडून संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. ही तांत्रिक समिती भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे. या समितीमध्ये महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि नौदलाचे अधिकारी असतील. राजकोट किल्ल्यावर झालेल्या सर्व प्रकरणाचा सखोल तपास ही कंपनी करणार आहे.

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, वर्षभरापूर्वी PM मोदींनी केलं होतं उद्घाटन
VIDEO : Rajkot Fort येथील ठाकरे आणि राणे समर्थकांच्या राड्यात किल्ल्यावरील चिरा कोसळली

नौदलाने प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलेय ?

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला झालेल्या दुर्देवाने झालेल्या नुकसानाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ञांसह भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त तांत्रिक समिती स्थापन करण्यात येत आहे.

मराठा नौदल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी संरक्षण आणि सुरक्षेच्या वारशाचा गौरव करण्याच्या उद्देशाने, सिंधुदुर्गात प्रथमच आयोजित नौदल दिनाच्या समारंभाचा भाग म्हणून 04 डिसेंबर 23 रोजी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रकल्पाची संकल्पना भारतीय नौदलाने तयार केली होती आणि राज्य सरकारच्या समन्वयाने त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता. भारतीय नौदल पुतळा लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी, नवा करण्यासाठी आणि पुनर्स्थापित करण्यासाठी सर्व उपायांमध्ये मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com