बिझनेस

Digital Payment Tips: दुसऱ्याच्या UPI खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले? मग परत तुमच्या खात्यात पैसा कसा येणार?

UPI Refund: पैसे चुकीच्या खात्यात किंवा UPIवर गेल्यास घाबरू नका. काही सोप्या ट्रिक्सचा वापर करून तुम्ही ट्रान्सफर झालेले पैसे लवकरच परत मिळवू शकता. जाणून घ्या प्रक्रिया कशी करावी?

Dhanshri Shintre

पूर्वीच्या काळात बहुतांश व्यवहार(Payment) हे रोख पैशांनीच करायचे. पण आता काळ बदलला, डिजीटल झपाट्याने विकसित झाले आणि सुविधा वाढल्या. आज जवळपास सर्व कामे ऑनलाईन होत आहेत. खरेदी असो, बँकिंग असो किंवा पेमेंट असो लोक मोबाईल किंवा कॉम्प्यूटर व्यवहार करतात. विशेषतः नेट बँकिंग आणि UPI हे डिजिटल पेमेंटचे अत्यंत लोकप्रिय पर्याय बनले आहेत. UPI मुळे काही सेकंदांतच पैसे ट्रान्सफर होतात. मात्र यात एक छोटी चूक झाली तरी पैसे दुसऱ्या किंवा चुकीच्या खात्यात जाऊ शकतात.

आता अशावेळी लोक घाबरतात आणि पॅनिक होतात. पण बैंकिंग माहितीनुसार, योग्य वेळी योग्य पावले उचलल्यास पैसे परत मिळवणे शक्य असते. जर चुकून पैशांचा व्यवहार दुसऱ्याच खात्यात गेला असेल, तर लगेच आपल्या बँकेच्या कस्टमर केअरशी(Customer Care) संपर्क साधणे हे पहिले पाऊल असावे.

अशा वेळी त्या पाठवलेल्या रकमेचा व्यवहार आयडी, बँक स्टेटमेंट, व्यवहाराचा स्क्रीनशॉट आणि रकमेची माहिती द्यावी. हे तपशील मिळाल्यानंतर बँकेचे अधिकारी प्रकरणाची चौकशी करतात आणि पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू करतात. तक्रार जितक्या लवकर केली जाईल, तितक्या लवकर पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते.

आजकाल UPI द्वारे पेमेंट करताना यूजर्स कधीकधी काळजी घेत नाहीत आणि चुकीच्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर होऊ शकतात. अशावेळी सर्वात आधी संबंधित UPI ॲपच्या हेल्प सेक्शनमध्ये तक्रार नोंदवावी. त्यानंतर ॲपच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून संपूर्ण व्यवहार तपशील द्यावा. तक्रारीच्या प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे उपलब्ध असणे महत्त्वाचे असते. कारण त्यामुळे कारवाई जलद होते. तंत्रज्ञानामुळे व्यवहार सोपे झाले असले तरी थोडीशी सावधगिरी बाळगल्यास पैसे चुकीच्या खात्यात जाण्याची शक्यता टाळता येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नालासोपारा शहरात संविधान बचाव रॅली

Karjat Tourism : कर्जतमध्ये लपलाय पांढरा शुभ्र धबधबा, पाहा नेमकं कसं जायचं?

Amruta Khanvilkar: उफ्फ क्या हे लूक है.... अमृताचा कातिल अंदाज, सौंदर्य पाहून पडाल प्रेमात

Crime News : MBBS च्या विद्यार्थिनीवर मित्रानेच केले अत्याचार; हॉटेलवर बोलावून बेशुद्धावस्थेत दुष्कृत्य, व्हिडिओही काढले

Tuesday Horoscope: पैसा, प्रेम सारं मिळणार, तुमच्या नशिबी काय? वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT