UPI Rule Change: आजपासून UPI मध्ये मोठा बदल! जाणून घ्या नवीन सुविधा आणि नियम

Digital Payments: आजपासून UPI मध्ये महत्त्वपूर्ण बदल लागू झाले आहेत. नवीन नियम, व्यवहार मर्यादा आणि सुविधा यामुळे डिजिटल पेमेंट्स अधिक सुरक्षित आणि सोपे होतील. यूजर्सनी या अपडेटची माहिती घेणे गरजेचे आहे.
UPI Rule Change: आजपासून UPI मध्ये मोठा बदल! जाणून घ्या नवीन सुविधा आणि नियम
Published On
Summary
  • NPCI ने व्हेरिफाइड मर्चंटसोबत एका दिवसात १० लाख रुपयांपर्यंत UPI व्यवहाराची मर्यादा वाढवली.

  • पर्सन-टू-पर्सन व्यवहाराची मर्यादा १ लाख रुपये दररोज राहिली आहे.

  • क्रेडिट कार्ड, कर्ज आणि EMI पेमेंटची मर्यादा प्रति व्यवहार ५ लाख रुपये, एका दिवसात जास्तीत जास्त १० लाख रुपये झाली आहे.

  • फोनपे, पेटीएम, गूगल पे यांसारख्या अ‍ॅप्सवर आता मोठ्या व्यवहारांसाठी वारंवार व्यवहार करण्याची गरज नाही, त्यामुळे पेमेंट प्रक्रिया जलद आणि सोपी होईल.

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरणाऱ्यांसाठी मोठा बदल जाहीर झाला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने मोठ्या व्यवहारांच्या मर्यादा वाढवल्या असून, १५ सप्टेंबर २०२५ पासून हे नियम लागू झाले आहेत. यानुसार, व्हेरिफाइड मर्चंटसोबत एका दिवसात आता १० लाख रुपयांपर्यंत ऑनलाइन पेमेंट करता येतील.

हा बदल शेअर बाजारातील गुंतवणूक, विमा प्रीमियम, क्रेडिट कार्ड बिल, कर्ज ईएमआय यांसारख्या ऑनलाइन व्यवहारांसाठी लागू होईल. फोनपे(Phone Pay), पेटीएम(Patym), गूगल पे(Google Pay) यांसारख्या UPI अ‍ॅप्सवर आता मोठ्या पेमेंटसाठी वारंवार व्यवहार करण्याची गरज नाही, त्यामुळे पेमेंट प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होणार आहे.

UPI Rule Change: आजपासून UPI मध्ये मोठा बदल! जाणून घ्या नवीन सुविधा आणि नियम
Jio Recharge Plan Offer: जिओने लाँच केले नवीन ७७ रुपयांचे प्लॅन; अतिरिक्त डेटा, OTT अ‍ॅक्सेस अन् बरंच काही...

दोन व्यक्तींमधील पर्सन-टू-पर्सन व्यवहाराची मर्यादा मात्र पूर्ववत १ लाख रुपये दररोज राहणार आहे. यामुळे व्यक्तीगत व्यवहारांवर काही बदल होणार नाही. UPI अ‍ॅप्सच्या दैनंदिन किंवा तासिक मर्यादा देखील कायम राहतील, त्यामुळे यूजर्ससाठी हा बदल फायदेशीर ठरेल.

UPI Rule Change: आजपासून UPI मध्ये मोठा बदल! जाणून घ्या नवीन सुविधा आणि नियम
Jio Prepaid Plans: जिओची धमाकेदार ऑफर! अतिरिक्त डेटा अन् एंटरटेनमेंटची मेजवानी

आधी फोनपे वापरणाऱ्यांसाठी किमान KYC असलेल्या यूजर्सना दररोज ₹१०,००० ट्रान्सफर करता येत होते, तर पूर्ण KYC यूजर्ससाठी प्रति व्यवहार ₹२ लाख आणि दररोज ₹४ लाख व्यवहार करता येत होते. पेटीएमवर दररोज ₹१ लाख, प्रति तास ₹२०,००० आणि प्रति तास जास्तीत जास्त ५ व्यवहार करता येत होते. गूगल पेवर दररोज ₹१ लाख आणि जास्तीत जास्त २० व्यवहार करता येत होते.

नवीन नियमांनुसार क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी UPI ची एक-वेळची व्यवहार मर्यादा आता ५ लाख रुपये असून, एका दिवसात जास्तीत जास्त ६ लाख रुपये भरणे शक्य आहे. प्रवासाशी संबंधित पेमेंट देखील एका वेळी ५ लाख रुपयांपर्यंत करता येतील. कर्ज आणि EMI पेमेंटची मर्यादा प्रति व्यवहार ५ लाख रुपये करण्यात आली असून, एका दिवसात जास्तीत जास्त १० लाख रुपये भरणे शक्य आहे. यामुळे मोठ्या कर्ज, ईएमआय किंवा गुंतवणूक संबंधित व्यवहार सुलभ आणि जलद होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com