Jio Recharge Plan Offer: जिओने लाँच केले नवीन ७७ रुपयांचे प्लॅन; अतिरिक्त डेटा, OTT अ‍ॅक्सेस अन् बरंच काही...

Dhanshri Shintre

जिओ रिचार्ज प्लॅन

जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या यादीत नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ग्राहकांना आता अधिक सुविधांसह नवीन प्लॅनची निवड करण्याची संधी मिळणार आहे.

७७ रुपयांचा प्लॅन

जिओने ७७ रुपयांचा नवीन डेटा व्हाउचर बाजारात आणला आहे. यामध्ये यूजर्सना ५ दिवसांसाठी ३ जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे.

अतिरिक्त डेटा फायदे

या प्लॅनमध्ये कंपनीकडून अतिरिक्त डेटा फायदे मिळतात. तसेच, ग्राहकांना ३० दिवसांसाठी Sony LIV अॅपचा मोफत अॅक्सेस देखील उपलब्ध करून दिला जातो.

ओटीटी सबस्क्रिप्शन

या प्लॅनअंतर्गत केवळ डेटा फायदे मिळतात. Sony LIV चा प्रवेश घेण्यासाठी यूजर्सना JioTV मोबाईल अॅपद्वारे लॉगिन करून कंटेंट पाहावा लागेल.

क्रिकेट डेटा पॅक

जिओच्या पोर्टफोलिओमध्ये हा प्लॅन क्रिकेट डेटा पॅक म्हणून दिला आहे. हा पॅक वापरण्यासाठी ग्राहकांकडे आधीपासूनच एक बेसिक रिचार्ज प्लॅन असणे गरजेचे आहे.

खास ऑफर्स

जिओने ९ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी सक्रिय बेस प्लॅन आवश्यक आहे.

आकर्षक रिचार्ज प्लॅन

जिओने सेलिब्रेशन ऑफरअंतर्गत ३४९, ८९९, ९९९ आणि ३५९९ रुपयांचे आकर्षक रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

जिओ गोल्डवर अतिरिक्त लाभ

या ऑफरमध्ये जिओ फायनान्सद्वारे जिओ गोल्डवर २% अतिरिक्त लाभ मिळेल आणि जिओहोमवर २ महिन्यांची मोफत ट्रायल सुविधा उपलब्ध आहे.

अजिओवर सूट

रिलायन्स डिजिटलवर ३९९ रुपये, अजिओवर २०० रुपये सूट मिळते, तसेच झोमॅटो गोल्डचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

NEXT: नेहमी घर, गाडीची चावी हरवतेय? मग जिओ दूर करेल तुमची समस्या, काय आहे Jio Tag Go?

येथे क्लिक करा